Sunday, June 22, 2025
Homeताज्या घडामोडीडॉ.विनय जोगळेकर यांचे वैद्यकीय, बँकिंग व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य गौरवास्पदः सीए. चंद्रकांत...

डॉ.विनय जोगळेकर यांचे वैद्यकीय, बँकिंग व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य गौरवास्पदः सीए. चंद्रकांत काळे

वाईः डॉ. विनय जोगळेकर यांनी गेली35 वर्षेवैद्यकीय व बँकींग क्षेत्रांत मोलाचे योगदान दिलेले आहे.वैद्यकीय सेवेच्या माध्यमांतून त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेची सेवा केलेली आहे.ज्ञानवर्धिनी संस्थेच्या माध्यमांतून शैक्षणिक क्षेत्रांत व वाई अर्बन बँकेच्या माध्यमांतून बँकींग क्षेत्रांत गौरवास्पद कामगिरी केली आहे, असे गौरवोदगार वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी व्यक्त केले.
डॉ.विनय जोगळेकर यांना पळशी (ता. खंडाळा) येथील कै.लक्ष्मणराव भरगुडे- पाटील यांच्या 37 व्या स्मृतीदिनी जीवनगौरव पुरस्कार मराठी चित्रपट अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. त्याबद्दल दि वाई अर्बन को.ऑप. बँकेच्यावतीने डॉ.जोगळेकर यांचाशाल, श्रीफळ व फेटा बांधून गौरव करण्यात आला.याप्रसंगी डॉ.जोगळेकर यांनी सामाजिक क्षेत्रांत गेली अनेक वर्षे केलेल्या कार्याचा उपस्थितांनी गौरव केला.
डॉ.जोगळेकर म्हणाले, मिळालेला पुरस्कार हा माझ्या घरच्या लोकांनी केलेला गौरव आहे.1979 मध्ये एम.एस.ही पदवी संपादन केल्यानंतर पुणे येथे काही दिवस नोकरी केली.तदनंतर शिरवळ येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत श्री सेवा फौंडेशन हे हॉस्पिटल सुरू केले.1984 सालापासून गावातील मित्रांची साथ लाभल्याने ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्था सुरू करून चांगली चालवता आली.सतत कामाचा त्रास असतानाही केवळ गावक-यांच्या आग्रहाखातर 20 वर्षांपूर्वी बँकेचा संचालक म्हणून बिनविरोध निवडून आलो.तेव्हांपासून वैद्यकीय, शिक्षण व बँकिंग या तिनही क्षेत्रांत काम करण्याची संधी मिळाली.मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नसून त्यामध्ये सर्वांचा सहभाग आहे.
कार्यक्रमास बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी संचालक मदनलालओसवाल, अ‍ॅड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, अ‍ॅड. सीए. राजगोपाल द्रवीड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, प्रा.विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॉ.शेखर कांबळे, स्वरूप मुळे, संचालिका सौ.अंजली शिवदे, सौ.गीता कोठावळे, सीए. किशोर कुमार मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी उपस्थितहोते.बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी डॉ.जोगळेकर यांचे अभिनंदन केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular