Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीपाणीसाठ्याचा अवैधरित्या उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी

पाणीसाठ्याचा अवैधरित्या उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी

सातारा : माण व खटाव तालुक्यासाठी उपलब्ध पाणीसाठा हा पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. या उपलब्ध पाणीसाठ्याचा कुठेही अवैधरित्या उपसा होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज दिल्या.
दहिवडी तहसिल कार्यालयात टंचाई आढावा बैठक जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, प्रांतांधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा देवकाते यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
चारा छावणीमध्ये शिधा पत्रिकांचा कॅम्प आयोजित करावा अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल पुढे म्हणाल्या, छारा छावणीमध्ये दाखल झालेल्या जनावरांचे पशुवैद्यकीय अधिकार्‍यांनी टॅगींग करावे. चारा छावणीतील जनावरांना रोजच्या रोज चारा, पाणी व पेंड व्यवस्थीत मिळतो की नाही याची वेळोवेळी तपासणी करावी. या संदर्भात छावणीतील शेतकर्‍यांशी प्रत्यक्ष चर्चा करावी. तसेच पेंडचे स्टॉक रजिस्टर वेळोवेळी तपासावे. चारा छावणीतील जनावरांचे 100 टक्के लसीकरण करावे. चारा छावणीतील हालचाल रजिस्टर वेळोवेळी तपासावे. इरिगेशन, पोलीस व महसूल विभागाने आपआपसात समन्वय साधून अवैधरित्या उपसा कुठेही होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही शेवटी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी केल्या.
माळणी ता. माण या गावाने यावषी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या गावी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज श्रमदान केले. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल म्हणाल्या, माळणी या गावात श्रमदानातून लोकांच्या श्रमदानातून जलसंधारणाचे चांगले काम सुरु आहे. हे गाव नक्कीच पाणीदार होईल. या गावाचा इतर गावांनीही आदर्श घ्यावा असे सांगून माळणी हे गाव वॉटर कप स्पर्धेत पारितोषिक पटकावेल असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला.
माळवाडी येथील चारा छावणीस जिल्हाधिकार्‍यांची भेट
जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज माण तालुक्यातील माळवाडी येथील चारा छावणीस भेट देऊन चारा छावणीतील शेतकर्‍यांशी संवाद साधला.
यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी जनावरांना चारा, पाणी , पेंड व्यवस्थित मिळतो का याची विचारपूस केली. तसेच पशुवैद्यकीय अधिकारी रोज चारा छावणीस भेट देतात का याबाबतही शेतकर्‍यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी हालचार रजिस्टर, छावणी भेट रजिस्टर, चारा वाटप रजिस्टर, चारा स्टॉक रजिस्टर, पेंड स्टॉक रजिस्टर तसेच सी सी टीव्ही कॅमेराचीही तपासणी केली. यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी ढाकणी तलावावरील फीडींग पॉईंटची तपासणी करुन ढाकणी तलावाची पाहणी केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular