Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीलुमणेखोल येथील श्री जानाईदेवी मंदिर जिर्णोद्धार उत्साहात

लुमणेखोल येथील श्री जानाईदेवी मंदिर जिर्णोद्धार उत्साहात

परळी : परळी पंचक्रोशीतील लुमणेखोल येथील श्री जानाईदेवी मंदिर जिर्णोद्धार उदघाटन सोहळा शुक्रवार दि.26 एप्रिल रोजी शिवसह्याद्री परिवार संस्थापक/अध्यक्ष ज्ञानेश्वर (भाई) वांगडे, यांच्या हस्ते करण्यात आले. या सोह़ळ्यानिमित्त परळी विभागातील प्रत्येक गावातील ग्रामस्थांची मोठयाप्रमाणावर उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी कार्यकारी अभियंता, कृष्णा खोरे महामंडळ, माजी जिल्हा परीषद सदस्य भिकुभाऊ भोसले, माजी पंचायतसमिती सदस्य बबनराव देवरे, उरमोडी धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष वसंतराव भंडारे, वडगांवचे ह.भ.प. विनायकबुवा बांबरस, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहीते, सायळीचे उद्योजक गणेशशेठ देवरे, शिवसह्याद्री संचालक चंद्रकांतदादा वांगडे, सायळी गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते शामराव सावंत तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
या जिर्णोध्दारासाठी मुंबई मंडळाचे अध्यक्ष अशोक माने व कार्याध्यक्ष सुरेद्र भंडारे व ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संपत माने व कार्याध्यक्ष मनोहर भंडारे तसेच त्यांच्या सहकाऱयांनी पुढाकार घेऊन जिर्णोध्दाराचे काम चांगल्या पध्दतीने यशस्वी केले.
या उद्घाटन प्रसंगी चंद्रकांतदादा वांगडे यांनी लुमनेखोलची ग्रामदेवतेचा पंचक्रोशीमध्ये कसा नाव लौकीक आहे ते स्पष्ट करुन गावातील जुन्या लोकांच्या आठवणी व त्यांना गावाबद्दलची तळमळ कशी होते.
या संबधी तरुणांना मार्गदर्शन केले व सर्वांनी हातात हात घालुन गावचा विकास साधावा असे आवाहन केले. भाई वांगडे यांनी देवीची ख्याती विशद करताना देवी साठी सढळहस्ते मदतही केली.
या वेळी रविंद्र भंडारे यांनी स्वागत केले. वसंत माने यांनी सुत्रसंचालन केले व मारुती माने यांनी उपस्थितांचे आभार मानले. शिवसह्याद्री परीवारातील सुभाष माने, अशोक भंडारे, तुकाराम माने. रविंद्र माने यांनी नियोजनांची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular