रोख रक्कमेसह दोन दुचाकी, मोबाईल, लॅपटॉप आदि मुद्देमाल ताब्यात
रहिमतपूर : सन 2017 मध्ये रहिमतपूर शहरासह कोरेगांव, खटाव, सातारा, कराड या तालुक्यातील पोलिसांची झोप उडवणारा दुर्गळवाडी (ता. कोरेगांव) येथील सराईत चोरटा राहुल चांगदेव यादव (वय 23) याला तत्कालीन पोलीस उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी अटक केली होती. त्याच्याकडून रोख रक्कम 50 हजारासह दोन मोटार सायकली, मोबाईल, लॅपटॉप आदि मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला होता.
रहिमतपुर पोलीस ठाणे हद्दीत झालेले कृषी सेवा केंद्रासह इतर 8 दुकाने फोडण्यात आलेली होती. सदरच्या 8 गुन्ह्यात प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक घनशाम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमतपूर पोलीस ठाण्या अंतर्गत तपासातील पुढील तपास करुन सदर आरोपीस प्रथम वर्ग न्यायालय कोरेगाव यांनी सर्व आठ गुन्ह्यात प्रत्येकी एक वर्ष कैद व 2500 रुपये दंड अशी शिक्षा देण्यात आली आहे. दरम्यान, इतर तालुक्यातील तपास चालू असून त्याची शिक्षा अजून बाकी आहे.
राहुल यादव याने नामी शक्कल वापरत खताच्या दुकानात रोजची उलाढाल होत असल्यामुळे खताची दुकाने लक्ष केली होती. प्रामुख्याने खताची दुकाने पत्राच्या शेडमध्ये असल्यामुळे केवळ पंचविशी पान्याच्या सहाय्याने चोरटा पत्रा उचकटून मुद्देमाल व रोख रक्कम लंपास करीत होता. या एकाच प्रकारच्या चोरी करण्याच्या पध्दतीमुळे पोलिसांना चोरट्याचा माग काढण्यात यश आले होते.
रहिमतपूर येथे दि. 22 ऑगस्ट 2017 रोजी मध्यरात्री रहिमतपूर-सातारा रस्त्यावर पेट्रोल पंपानजीक असणार्या श्री बळीराजा कृषी सेसा केंद्र या खताच्या दुकानात चोरट्याने शटर उचकवटून आत प्रवेश केला होता. रहिमतपूर पोलिसांच्या रात्रगस्तीवेळी सपोनि श्रीगणेश कानगुडे, पोलीस नाईक जगदीश कणसे, चालक राजकुमार किर्दत यांना या दुकानाच्या बाहेर उभी केलेली मुंबई पासिंगची नंबरप्लेट असलेली दुचाकी संशयितरित्या आढळली. या संशयावरुनच खताच्या दुकानाची तपासणी केली. त्यावेळी दुकानाच्या बाहेर भिंतीच्या कडेला त्याचे जर्कीन, सॅक, पाकीट असे साहित्य सापडले होते. मुंबई येथे तपास पथके पाठवून तेथील माहितीच्या आधारे आरोपी दुर्गळवाडी (ता.कोरेगांव) आपल्या गावी आला असल्याने पोलिसांनी सापळा रचून आरोपीस राहत्या घरी ताब्यात घेतले.
चोरट्याचे निवासस्थान पुलाखालच्या नळीमध्ये (पाईपमध्ये) – राहुल यादवने आपल्यर कुटुंबियांनी आपण पुणे व मुंबई येथे नोकरी करीत असल्याचे सांगितल होते. त्यावेळी गेला तीन ते चार महिने त्याने औंध-वरुड रस्त्यावरील तिलकी नावाच्या ओढ्यात असणार्या पुलाच्या पाईपमध्ये आपला मुक्काम ठोकला होता. दरम्यान, राहुल हा चोरी केलेले पैसे व मुद्देमाल मुंबई, पुण्यात मौज मजा करीत होता.
सदरच्या गुन्ह्यात प्रभारी सपोनि घनशाम बल्लाळ, तत्कालीन सपोनि श्रीगणेश कानगुडे, सहाय्यक फौजदार विजय जाधव,पो.हवा.प्रकाश इंगळे,पो.नाईक जगदिश कणसे, पो.कॉस्टेबल सचिन राठोड, सागर पाटील यांनी सहभाग घेतला.
सराईत चोरटा राहुल यादवला अटक
RELATED ARTICLES