साताराः येथील ज्येष्ठ करसल्लागार आणि माजी विक्रीकर उपायुक्त अॅड.विनायकराव आगाशे यांची कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या निमंत्रित सदस्यपदासाठी निवड करण्यात आली आहे. सन 2019-20 या सालासाठी कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या संचालक मंडळाने श्री आगाशे यांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा ज्ञान सर्व सभासद उद्योजक बंधूंना होण्यासाठी ही निवड केली आहे.
निवडीबाबतचे पत्र संस्थेचे मानद अध्यक्ष अतुल आरवाडे, उपाध्यक्ष रणजित शाह, सचिव हर्षद दलाल, व खजिनदार कमलाकांत कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने आगाशे यांच्याकडे प्राप्त झाले आहे.
या निवडीबद्दल सातारा येथील ज्येष्ठ ज्योतिषतज्ञ प्राचार्य रमणलाल शहा, ज्येष्ठ व्यापारी गुरूप्रसाद उर्फ खंडूशेठ सारडा, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले, मोहनशेठ पुरोहित, महेश कुलकर्णी आणि सातारा जिल्हा करसल्लागार संघटनेच्या अनेक मान्यवर पदाधिकारी व सदस्यांनी श्री आगाशे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
अॅड.विनायकराव आगाशे यांची कोल्हापूर इंजि.असो.च्या निमंत्रित सदस्यपदी निवड
RELATED ARTICLES