Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीमहाबळेश्‍वर येथे जय भवानी जय शिवाजीच्या गजरात शिवजयंती साजरी

महाबळेश्‍वर येथे जय भवानी जय शिवाजीच्या गजरात शिवजयंती साजरी

महाबळेश्वर ः जय भवानी जय शिवाजी ढोल ताशे नगार्‍याचा गजर अश्या उत्साही वातावरणामध्ये आकर्षक अश्या फुलांनी सजवलेल्या रथामधून छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पारंपरिक पद्धतीने शाही मिरवणूक मोठ्या उत्साहात व जल्लोषात काढण्यात आली शहरासह संपूर्ण तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात,दणक्यात व जल्लोषात साजरी करण्यात आली.
शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने रविवारी सायंकाळी येथील पेटीट लायब्ररी मध्ये स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देणारी येथील नाट्यशिव प्रतिष्ठान संस्थेच्या वतीने ऐतिहासिक महानाट्य रणझुंजार धर्मवीर शंभूराजे या भव्य नाटकाचे आयोजन करण्यात आले होते या नाटकामध्ये शेकडो स्थानिक कलावंत सहभागी झाले होते.प्रतापगड,रायगड येथून पहाटे पासून शिवज्योती घेऊन आलेले विविध ठिकाणचे शिवप्रेमी महाबळेश्वर मार्गे मार्गस्थ होते होते..जय भवानी जय शिवाजी अश्या गगनभेदी घोषणांनी महाबळेश्वर व परिसर दुमदुमून गेलाहोता.शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील चौकाचौकात कमानी,मुख्य बाजारपेठेसह सर्व परिसर भगव्या झालरी सर्वत्र भगवे झेंड्यानी सजविण्यात आला होता.शिवपराक्रमाची साक्ष देणारे चित्रफलक देखील बाजारपेठेत लावण्यात आले होते शहरात सर्वत्र पोवाडे व सनईचे सूर ऐकू येत असल्याने संपूर्ण वातावरणच शिवमय झाले होते.सोमवारी सकाळी किल्ले रायगड येथून शिवज्योतीचे आगमन झाले तदनंतर सुभाष व छ शिवाजी चौकामध्ये शिवजयंती उत्सव समितीच्या सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहणव ध्वजपूजन करण्यात आले येथील शिवाजी चौक येथे रुद्राभिषेक तर पाळणा कार्यक्रम कोळीअळी येथे पार पडला तर दुपारी भव्य शिवदौड अर्थात बाईक रॅलीचे देखील आयोजन करण्यात आले होते.
सोमवारी सायंकाळी छ.शिवाजी महाराजांच्या भव्य शाही मिरवणुकीचा प्रारंभ येथील जननीमाता मंदिर,कोळीअळी येथून छ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ वाढवून उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन पवार यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपनगराध्यक्ष अफजल सुतार,नगरसेवक युसूफ शेख,रविंद्र कुंभारदरे,नगरसेविका आफरीन वारुणकर,विमल ओंबळे,सुनिल साळुंखे,संतोष शिंदे,पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी,शिवसेनेचे गोपाळ वागदरे,सचिन वागदरे,दिलीप रिंगे,शिवसेना शहरप्रमुख विजय नायडू,नाशिवप्रति.चे किसन खामकर,विशाल तोष्णीवाल,चंद्रकांत पांचाळआदी मान्यवर उपस्थित होते.
या शाही मिरवणुकीच्या अग्रभागी ताथवडे येथिल नरसिंह मंडळ व नायगांव येथील ढोल पथके,हलगी पथक,तुतारी शेकडो शिवभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले होते ढोलताश्यांचा गजर,भगव्या टोप्यानी तर संपूर्ण वातावरणच भगवेमय झाले होते.सिंहासनावर आरूढ असलेली शिवरायांची प्रतिमा,फुलांची मनोहारी सजावट केलेला रथ सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती मिरवणूकीचा प्रारंभ कोळीअळी येथून झाला ही भव्य मिरवणूक सुभाष चौक मार्गे मुख्य बाजारपेठे मार्गे शिवाजी चौक येथे अली तेथे पोहचली.छ शिवाजी चौकात महाआरती झाल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी उपाध्यक्ष नितीन परदेशी आशिष चोरगे,कार्याध्यक्ष सचिन गुजर,खजिनदार शुभम कुंभारदरे,सचिव राहुल शेलार,आनंत भिसे,रामदास जाधव,संजय आोंबळे,सहसचिव बाळासाहेब पांचाळ,संतोष साळुंखे आदींनी परिश्रम घेतले

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular