शरद पवार यांची उपस्थिती राहणार
सातारा : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाउराव पाटील यांच्या 60 व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार दि. 9 मे रोजी सकाळी 8.30 वाजता कर्मवीर समाधी परिसर सातारा येथे करण्यात आले आहे. रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री खा. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास सातारा शहरातील शिक्षण प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असे आवाहन संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. भाउसाहेब कराळे यांनी केले आहे.
कर्मवीर पुण्यतिथी कार्यक्रमाचे औचित्य साधून याप्रसंगी कर्मवीर पारितोषिक विजेत्या शाखांचे शाखाप्रमुख राज्य पुरस्कार मिळालेले शिक्षक, राष्ट्रीय मुल्यांकन व अधिस्वीकृती समिती बैंगलोर (नॅक) कडून संस्थेच्या ज्या महाविद्यालयांचे या वर्षी मुल्यांकन झाले आहे व त्यामध्ये ए पल्स, ए मानांकर प्राप्त झालेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा प्राप्त केलेले प्राचार्य, थोर देणगीदार, एमपीएससी व युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेले विद्यार्थी यांचा खा. शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सचिव डॉ. कराळे यांनी केले आहे.
कर्मवीर भाउराव पाटील यांची आज 60 वी पुण्यतिथी
RELATED ARTICLES