Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीकराडात अवतरले होते भगवे वादळ...शाही मिरवणुकीने शिवजयंतीची सांगता

कराडात अवतरले होते भगवे वादळ…शाही मिरवणुकीने शिवजयंतीची सांगता

कराड: पारंपारिक तिथीनुसार शहरात मोठया उत्साहात शिवजयंती महोत्सवाची अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शाही दरबार मिरवणुकीने उत्साहात सांगता झाली. सायंकाळी हजारोंच्या सहाभागाने काढण्यात आलेली शाही दरबार मिरवणुक खास आकर्षण ठरली. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणानी आसमंत दणाणला होता. आकर्षक ठरली. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणांनी आसमंत दणाणला होता. आकर्षक आतषबाजीने शहर उजळून निघाले. शहरासह तालुकयातील युवक, महिला व नागरिकांनी दरबार मिरवणुकीसाठी उपस्थिती लावल्याने मिरवणुक मार्ग गर्दीने फुलून गेला होता.
सायंकाळी सातवाजण्याच्या सुमारास पांढरीचा मारूती मंदिराजवळ श्रीफळ वाढवुन दरबार मिरवणुकीस प्रारंभ झाला. प्रांतअधिकारी हिम्मत खराडे, पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे,वरीष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, तहसीलदार अमरदीप वाकडे, हिंदू एकताचे प्रांतिक अध्यक्ष विनायक पावसकर भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, चंद्रकांत जिरंगे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध संंघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. मिरवणुकीच्या अग्रभागी ढोल-ताशा व ध्वजपथक, बॅण्ड अश्‍वदल, हत्तीवर विराजमान छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, पालखी, रथातील शिवाजी महाराज, विविध चित्ररथ असा मिरवणुकीचा लवाजमा होता. हातात भगवे ध्वज घेऊन डीजेच्या तालावर युवक घोषणा देत होते. भगवे फेटे घातलेल्या महिला, युवतींची संख्याही मोठी होती.
मिरवणुक मंगळवार पेठेतुन चावडी चौक, आझाद चौक मार्गे दत्त चौकात आली मिरवणुक पुढे सरकत असताना करून स्वागत केले जात होते. युवकही मोठया संख्येने मिरवणुकीत सहभागी होत होते. रस्त्यंाच्या दुतर्फा मिरवणुक शहराच्या मध्यभागात आल्यानंतर मिरवणुकीचा उत्साह टिपेला पोहोचला होता. ऐतिहासिक चित्ररथासह दत्त चौक येथे सजावटी व चित्ररथ स्पर्धैचे बक्षीस वितरण होऊन रात्री मिरवणुकीची सांगता झाली. पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पेालिस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलिस बंदोबस्त मिरवणुकीसाठी तैनात करण्यात आला होता. एकंदरीत कराड शहरात शिवजयंती मोठया उत्साहात पार पडली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular