भुईंज : आसनगांव गावच्या ओढ्याचे खोलीकरण आणि रूंदीकरणाचे काम होऊन बर्याच वर्षापुर्वी झाले होते. आगामी काळात पाऊस पडला नाहीतर पिण्याच्या पाण्याबरोबर, शेती आणि पशुधन धोक्यात येणार आहे. पाऊस समाधानकारक झाल्यास पाणीसाठा करणे गरजेचे आहे. यासाठी जलसंधारण कामासांठी आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्रितरित्या कामांस सुरूवात केली. राजकीय अभिनिवेश बाजुला ठेवीत गावचा पाणीप्रश्न कायमचा निकालात निघावा यासाठी किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी किसन वीर कारखान्याच्या माध्यमातुन जलसंधारण कामासाठी केलेल्या मदतीमुळे आसनगाव आगामी काळात जलयुक्त होणार असल्याचे, प्रतिपादन सीमा सुरक्षा दलाचे निवृत्त जवान प्रदीप शिंदे यांनी व्यक्त केली.
किसन वीर साखर कारखाना व्यवस्थापनाने कार्यक्षेत्रातील दुष्काळ व पाणी टंचाईचा सामना करणार्या गावातील जलसंधारणाच्या कामांसाठी सामाजिक बांधिलकीतुन पोकलेन मशिन दिले आहे. आसनगांव ता. कोरेगांव येथील आळ्याचा ओढा खोलीकरण व रूंदीकरण, छोटा माती नाला बंाध या व इतर जलसंधारण कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम, विजय चव्हाण कोरेगांव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक अनिल शिंदे, खादी ग्रामाद्योग संंस्थेचे माजी चेअरमन संभाजीराव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ते पुढे म्हणाले, किसन वीर कारखान्याला आमचा ऊस कमी अधिक प्रमाणात जातो. अशा परिस्थितीत किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादांनी यांनी कारखान्याच्या माध्यमातुन आम्हांला केलेली मदत आसनगांव ग्रामस्थांच्या हातांना बळ देणारी ठरलेली आहे. मदनदादांनी आमच्या गावाला भेट देऊन जलसंधारण कामाची पाहणी करू आम्हांस मार्गदर्शन करावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम यांनी आपल्या मनोगतात यंदाच्या दुष्काळी परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी ग्रामस्थांची एकजुट असणे आवश्यक आहे. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी दुष्काळी भागातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेउन जलसंधारण कामांसाठी मदत करण्याची भुमिका घेतलेली आहे. सांघीक शक्तीने काम केल्यास आपण या दुष्काळास हद्दपार करू शकू असा आत्मविश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संभाजीराव शिंदे यांनी तर आभार अनिल शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य पोपटराव भोज, बबनराव कदम, अविनाश सांवत, प्रेमसिंग शिंदे, उत्तम गाडे, दत्तात्रय शिंदे, दिपक गायकवाड, सुभाष शिंदे, हेमब्रसिंग शिंदे, निलकंठ शिंदे, सुभाष शिंदे, प्रशांत शिंदे, चंद्रकांत शिंदे, विनोद कळंभे, किशोर शिंदे, राजेंद्र शिंदे, अनिल सांवत, विरसिंग शिंदे, बाळासोा शिंदे, हणमंत शिंदे, कांतीलाल शिंदे, गणपत शिंदे, दिलीप शिंदे, सचिन गाडे, धनाजी शिंदे, हिंदुराव शिंदे, शशीकांत शिंदे, रामदास शिंदे, अंकुश शिंदे, यशवंत शिंदे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किसनवीरच्या मदतीने आसनगांव होणार जलयुक्तः प्रदीप शिंदे
RELATED ARTICLES