Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीगीत, संगीत व नृत्याच्या तालावर युपीत रंगला मराठी आवाज

गीत, संगीत व नृत्याच्या तालावर युपीत रंगला मराठी आवाज

वडूज: उत्तरप्रदेशातील लखनऊ शहरात महाराष्ट्र दिन सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भजन, किर्तन, भावगीत, भक्तीगीत यांच्यासह दर्जेदार नृत्याने लखनऊ येथील भातखंडे संगीत विद्यालयात मराठीचा आवाज चांगलाच घुमला.
राज्यपाल राम नाईक, महापौर संयुक्ता भाटीया आदिंसह मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलनाने या कार्यक्रमास सुरुवात झाली. दीपप्रज्वलनानंतर संजय देघूलकर व संजय देशमानकर व सहकार्‍यांनी जय जय महाराष्ट्र या स्फुर्ती गीताने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर जीवनात ही घडी अशीच राहुदे, देव देव्हार्‍यात नाही, विठ्ठला कोणता झेंडा घेवू हाती अश्या एकापेक्षा एक सरस मराठी गाण्यांचे सादरीकरण झाले. त्यानंतर विजयकृष्ण भगवान व त्यांची कन्या वेदिगा भागवन यांची किर्तन जुगलबंदी झाली. या किर्तनात त्यांनी नारदीय किर्तन व भागवती किर्तन यातील फरक स्पष्ट केला. तसेच संत नामदेव महाराज व रामदास स्वामींच्या किर्तन परंपरेची माहिती दिली.
यावेळी दक्षिण भारतीय भरतनाट्यम कलेचे नृत्य सादरीकरणही झाले. राज्यपाल नाईक यांनी महाराष्ट्र व उत्तरप्रदेशचे स्वातंत्र्य पूर्व काळापासून आगळे नाते असल्याचे भाषणात सांगितले. नानासाहेब पेशवे, लोकमान्य टिकळ, पत्रकार बाबुराव पर्‍हाडकर यांच्या कार्यास उत्तरप्रदेशातून चांगले सहकार्य मिळाल्याचे यावेळी त्यांनी भाषणात सांगितले. महापौर भाटीया यांनी मराठी समाज उत्तरप्रदेश संघटनेच्या माध्यमातून 31 जिल्ह्यातील मराठी समाजबांधव एकत्र झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या सर्वांचे स्वागत करण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
संस्थापक अध्यक्ष उमेश पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. उपाध्यक्ष विश्‍वनाथ देवकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पुलवामा हल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पन करण्यात आली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular