लोकांची दिशाभूल थांबवावी; दत्तात्रय जगदाळे यांची माहिती
औंध : औंध येथील दोन पाझर तलाव मंजुर करण्यामध्ये डॉ. दिलीप येळगावकर यांचा कोणताही संबंध नसून ती कामे आपण स्वता ,औंध ग्रामस्थांच्या सहकार्याने ,शासकीय स्तरावर पाठपुरावा करून, विविध आंदोलने, उपोषणे करून सामूहिक प्रयत्नातून
मंजूर केली असून डॉ. येळगावकर यांनी विनाकारण लोकांची दिशाभूल करू नये अशी माहिती येथील राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय जगदाळे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे दिली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात दत्तात्रय जगदाळे यांनी म्हटले आहे की,औंध ता.खटाव येथील सर्व्ह नं.61मध्ये नवीन पाझर तलाव मंजूर करणेसाठी आपण जिल्हाधिकारी सातारा यांना 19आँक्टोबर 2015रोजी निवेदनाद्वारे मागणी केली होती. याबाबत जिल्हाधिकारी यांनी लघुपाटबंधारे विभागास कळविले होते. या विभागाकडून ही कामे शक्य नसल्याने 3आँक्टोबर 2016रोजी दोन्ही तलावांची कामे जलसंधारण विभाग कराड यांचेकडे वर्ग करण्यात आली होती.त्यानंतर 2016-17मध्ये जिल्ह्यातील 210गावांचे जलआराखडे जिल्हाधिकारी यांनी बेकायदेशीरपणे कमी केले होते. हि बाब सर्व ग्रामपंचायतीना लेखी पत्रे पाठवून आपण निदर्शनास आणली होती तसेच याबाबत औंध येथे उपोषण ही केले होते. यावेळी फक्त औंध ग्रामस्थ, युवक, शेतकर्यांनी पाठिंबा दिल्याने शासनाने याची दखल घेऊन शासनाने औंध येथील दोन्ही तलावांचे सर्वेक्षण ,तपासणी, अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश कराड जलसंधारण विभागाला दिले होते तसेच 15 बंधार्याना विशेष बाब म्हणून मंजूर करण्याचे आश्वासन दिले होते.याबाबत आपण स्वतः शासकीय स्तरावर औंध येथील ग्रामस्थ, युवकांना,शेतकर्यांना बरोबर घेऊन याकामाचा पाठपुरावा केला होता सामूहिक प्रयत्नातून आपण ही कामे मंजूर करून घेतली आहेत. मात्र येळगावकर मंजुरीचे पत्र दाखवून आपण हे काम मंजूर केल्याचे भासवत आहेत मात्र अशा भुलथापांना औंधची जनता भुलणार नसून त्यांचा या कामाशी कोणताही संबंध नाही जर डॉ. येळगावकर यांना काम करायचेच असेल तर 2016-17साली मायणी येथील जलशिवारची सुधारित आराखडयात मंजूर 106 कामे जिल्हाधिकारी यांनी बेकायदेशीरपणे कमी केली आहेत त्यामुळे मायणीची मोठी जलतूट शिल्लक राहिली आहे तिकडे डॉ. येळगावकर यांनी लक्ष द्यावे व ती कामे पूर्ण करून घ्यावीत व तेथील जनतेला दिलासा द्यावा असे जगदाळे यांनी निवेदनात म्हटले आहे.
औंध येथील पाझर तलाव मंजुरी मध्ये डॉ. येळगावकर यांचा कोणताही संबंध नाही
RELATED ARTICLES