Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीश्री भैरवनाथ यात्रेनिमित्त म्हासुर्णे रंगला कुस्त्यांचा आखाडा ; लहान मोठया तसेच...

श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त म्हासुर्णे रंगला कुस्त्यांचा आखाडा ; लहान मोठया तसेच महिला कुस्त्यांनी जिंकली प्रेक्षकांची मने

 

म्हासुर्णे :- म्हासुर्णे ता.खटाव येथील गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाची यात्रेची सांगता कुस्त्याच्या भव्य आखाड्याने झाली .
या कुस्त्याच्या मैदानामध्ये या भागातील नामवंत मल्लांनी हजेती लावली होती. या मैदानात अनेक चितपट कुस्त्या झाल्यामुळे कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
यावेळी कुस्ती पाहवयास आलेल्या प्रेक्षकांनी कुस्तीचा आनंद लुटला.
परंपरेप्रमाणे भरणार्‍या या यात्रेमध्ये कुस्त्यांचा आखाड्याचे उद्घाटन सरपंच सचिन माने यांच्या हस्ते व महादेव माने,उपसरपंच सुहास माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,विठ्ठल माने,सिकंदर मुल्ला,आबासो यमगर,ज्ञानेश्वर माने,नवनाथ माने सर्व यात्रा कमेठी पदाधिकारी यांच्या उपस्थित झाला . तसेच भक्तीमय वातावरणात यात्रा उत्सव पार पडला .
या ठिकाणी श्री भैरवनाथ यात्रेत आदल्या दिवशी सकाळी सात वाजता गुलाल खोबर्‍यासह पालखी सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी दुसर्‍या दिवशी सायंकाळी पाच च्या सुमारास कुस्त्याच्या फडात पुसेसावळी, म्हासुर्णे, खटाव पारगाव, मायणी, मसुर,अौंध, कुंडल,खवसपुर,वडियेरायबाग, कडेगाव ,कराड या भागातील मल्लांच्या कुस्त्या लक्षवेधी ठरल्या.
यामध्ये पन्नास रुपयांपासुन एक लाख एक्कावंन्न हजार रुपयापर्यतच्या कुस्त्यांचे सामने रंगले.तर काही कुस्त्या निकाली झाल्या .पंच म्हणुन एम.पी.माने,आण्णासो माने,राजाराम माने,किसन माने,गोरख माने,तुळशिराम माने,नामदेव माने,चंद्रकांत माने,गुलाब वायदंडे,आबासो यमगर,राजेंद्र माने,लालासो वायदंडे,नंदकुमार माने,अजित माने,रामचंद्र माने ,जालिंदर माने,यांनी पंच म्हणून काम पाहिले.
तसेच शालेय मुलांना सुट्टी लागल्यामुळे बाहेर गावी
असणारे भाविकांची गर्दी मोठ्याप्रमाणात होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular