सातारा : जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबईस्थित अल अदील समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंगफ डॉ. धनंजय दातार येत्या 19 मे (रविवार) रोजी सातार्यात येत आहेत. येथील अश्वमेध वाचनालय आणि ग्रंथालयातर्फे कै. सौ. सुमित्रा नरसिंगराव क्षीरसागर स्मृत्यर्थ आयोजित व मिती क्रिएशन्स निर्मित उद्योग प्रेरणा कार्यक्रमांतर्गत डॉ. दातार आपली यशोगाथा उपस्थितांपुढे उलगडणार आहेत. शाहू कला मंदिरमध्ये सायंकाळी सहाला होणार्या या कार्यक्रमात प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने या डॉ. दातार यांची प्रकट मुलाखत घेणार असून नंतर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होणार आहे. सातारकर नागरिक, तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांना डॉ. दातार यांच्याशी थेट संवाद साधण्याची व उद्योजकतेविषयी प्रश्न विचारण्याची संधी त्यातून मिळणार असल्याचे कार्यक्रमाचे निमंत्रक, अश्वमेध वाचनालय व ग्रंथालयाचे संस्थापक तथा सातारा नगर परिषदेचे माजी सभापती रविंद्र भारती-झुटिंग यांनी नमूद केले आहे.
जिद्द, अफाट मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रात अनेक उद्योजक घडले आहेत. यातील काही मोजक्या उद्योजकांनी भारतातच नव्हे, तर जगातही आपल्या उद्योगाचे साम्राज्य निर्माण केले आहे. दुबईतील सुप्रसिद्ध अल अदील समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेल्या डॉ. दातार यांनी गेल्या 35 वर्षांत आपल्या व्यवसायाचा आखाती देशांत प्रचंड जम बसवला. दुबईमध्ये एका छोट्याशा दुकानापासून व्यवसायास सुरुवात करणार्या दातार यांनी आखाती देशांत 40 सुपर मार्केट्सची स्वत:ची रीटेल आऊटलेट्सची साखळी निर्माण केली आहे. अल अदीलच्या 40 व्या सुपर स्टोअरचे उद्घाटन नुकतेच अबू धाबीमध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिच्या हस्ते दिमाखात झाले. धनंजय दातार यांची अल अदिल ट्रेडिंगफ कंपनी आखाती देशांतील स्थानिक व भारतीयांच्या घराघरांत पोचली आहे.
डॉ. धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली अल अदील ट्रेडिंग कंपनीने 9000 भारतीय उत्पादने संयुक्त अरब अमिरातीत (युएई) आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असून स्वतःच्या पिकॉक या ब्रँडअंतर्गत तयार पिठे, मसाले, लोणची, मुरंबे, नमकीन, इन्स्टंट अशा श्रेणींत 700 हून अधिक उत्पादने ग्राहकांना उपलब्ध करुन दिली आहेत. मसाले व पिठे तयार करुन पॅकबंद करण्यासाठी डॉ. दातार यांनी दुबई इन्व्हेस्टमेंट पार्कमध्ये दीड लाख चौरस फुटांचा भव्य प्रकल्प उभारला आहे. त्यांच्या उद्योगाची भारतीय शाखा मसाला किंग एक्स्पोर्ट्स या नावाने मुंबईत कार्यरत आहे.
अल अदील समूहाचे 40 आऊटलेट्स, आधुनिक तंत्रज्ञानयुक्त 2 पिठाच्या गिरण्या व 2 मसाला कारखाने असे जाळे दुबई, अबू धाबी, शारजा व अजमान येथे विस्तारले असून मुंबई निर्यात विभागाची शाखा मसाला किंग एक्स्पोर्ट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड नावाने मुंबईत आहे. अल अदील समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून त्याने नुकतीच दुबईसह ओमान, बहारीन व सौदी अरेबियामध्ये नवी आऊटलेट्स उघडली आहेत. कंपनीने अमेरिका, कॅनडा, टांझानिया, केनया, स्वित्झर्लंड, इटली व एरित्रिया, तसेच कुवेत, ओमान व संयुक्त अरब अमिरातीत विशेष व्यापारी मार्ग स्थापन करुन आयात व निर्यात क्षेत्रातही विस्तार साधला आहे.
मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांची सातार्यात, येत्या 19 मे रोजी प्रकट मुलाखत व मार्गदर्शन
RELATED ARTICLES