कातरखटाव: सातारा येथिल प्रसिदृध योग प्रशिक्षक श्री. शामराव नांगरेपाटील व त्यांचे सहकारी तसेच कातरखटाव येथिल योगप्रेमी नागरीक संघटना व शिक्षक विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने कातरखटाव येथिल कात्रेश्वर मंदिर परिसरात पाच दिवसाचे निशुल्क योग प्रशिक्षण शिबिर राबविण्यात आले. या प्रशिक्षणास महिलांनी, पुरुषांनी व मुलांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घोतला होता. सर्व प्रकारच्या योगसाधना व प्राणायामाचे प्रशिक्षण पाटील यांनी दिले. मानवी जीवनात प्राणायामाचे व योगासनाचे किती महत्व आहे. प्राणायाम व योगासनाने कितीप्रकारचे दुर्धर आजार बरे होतात हे या ठिकाणी पटवून दिले. ज
जो करील योग, त्याच्यापासून दुर राहील रोग या उक्तीप्रमाणे रोगावरील किंवा आजारवरील नियंत्रणासाठी कोणते योग करावेत कोणते प्राणायाम करावेत याचे महत्व पटवून दिले. प्रत्येक व्यक्तीकडे वैयक्तीक लक्ष देवून त्याच्याकडून योगसाधना करून घेतली. सर्व प्रशिक्षणार्थी यांनी योगाचे महत्व पटवून घेतले तसेच दररोज नियमितपणे योगसाधना करण्याचा निश्चय बांधला. पाटील यांचे सहकारी निरंजनी नांगरे, विद्या जाधव, अंजली पवार, विद्या शेटटी, पदमा चौधरी, मीना बागल, बबन बागल यांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना लाभले. पोपट बागल, राजेंद्र बागल, धनंजय चिंचकर, वनिता पोरे, कल्पना पोरे आदिनी योगसाधना प्रशिक्षण पार पाडण्यास मोलाची मदत केली.
जो करील योग, त्याच्यापासून दुर राहील रोग.. कातरखटावकरांनी घेतले योग प्रशिक्षणाचे धडे
RELATED ARTICLES