सातारा: स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या जयंतिनिमीत्त गुरुवार दि. 16 मे रोजी विविध धार्मिक व समाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुुरुवारी सकाळी 9.15 वाजता अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना लि. शेंद्रे कार्यस्थळावरील स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या स्मृतिस्थळावरील पुर्णाकृती पुतळा व स्मृतिस्तंभास विनम्र अभिवादन व पुष्पांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम होणार आहे. श्रीमंत छ. रूद्रनीलराजे सोशल ङ्गौंडेशनतर्ङ्गे दिवड ता. माण येथील चारा छावणीतील दुष्काळग्रस्त शेतकर्यांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी 6 वाजता श्रीमंत. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्रसमुह जावली यांच्यावतीने मेढा येथील पोलीस परेड मैदानावर गौरव महाराष्ट्राचा हा कार्यक्रम होणार आहे. सातारा तालुक्यातील भाऊसाहेब महाराज प्रेमी कार्यकर्त्यांनी ठिकठिकणी सामाजिक उपक्रम घेतले आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सातारा पंचायत समिती, सातारा तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, सातारा तालुका खरेदी- विक्री संघ आदींसह सातारा तालुक्यातील विविध सहकारी व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्व. अभयसिंहराजे भोसले यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले जाणार आहे. तसेच सातारा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात विविध ठिकाणी विविध सहकारी संस्था, मंड ळे व स्व. अभयसिंहराजे भोसले प्रेमी ग्रामस्थांच्या वतीने अभिवादनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. 17 रोजी परळी ता. सातारा येथे सायंकाळी 7 वाजता सुश्राव्य किर्तन सोहळा होणार आहे.
स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले यांच्या जयंतीनिमीत्त आज विविध कार्यक्रम
RELATED ARTICLES