Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीठोंबरेवाडीतील जळीतग्रस्त कुटूंबांना आ. शिवेंद्रराजे यांची मदत

ठोंबरेवाडीतील जळीतग्रस्त कुटूंबांना आ. शिवेंद्रराजे यांची मदत

सातारा : ठोंबरेवाडी ता. सातारा येथे नुने ते गवडी रस्त्यानजीक असलेल्या माळरानावर बबन राऊ बाबर आणि सुदाम राऊ बाबर यांची दोन घरे आगीत भस्मसात झाली. संसारोपयोगी साहित्य, सोनेनाणे यासह पशुधन जळून न भरुन येणारे नुकसान झाले. दरम्यान, या जळीतग्रस्तांना आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने मदतीचा हात दिला असून या दोन्ही कुटूंबांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी धान्य आणि आवश्यक साहित्य पुरवल्याने एक जबाबदार आणि जनतेचे हित जोपासणारा लोकप्रतिनिधी कसा असावा, हे पुन्हा एकदा सिध्द झाले आणि आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यातील माणुसकीचे दर्शन ठोंबरेवाडीतील ग्रामस्थांना घडले.
गुरुवारी रात्री 12.30 च्या सुमारास बबन बाबर आणि सुदाम बाबर या दोघा भावांच्या घरांना अचानक आग लागली. या आगीत दोन्ही घरे झळून खाक झाली तर, संसारोपयोगी साहित्य, सोने, रोकड, कपडे यासह म्हैसी, कोंबड्याही जळून भस्मसात झाल्या होत्या. अग्नितांडवामुळे ही दोन्ही घरे अक्षरश: रस्त्यावर आली. याची माहिती मिळताच आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी तातडीने या दोन्ही कुटूंबांना जीवनावश्यक वस्तू आणि धान्य देवू केले. हे साहित्य बाबर कुटूंबीयांना आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे कार्यकर्ते पंचायत समितीचे माजी सभापती धर्मराज घोरपडे, नामदेव सावंत, अरुण कापसे, सागर पवार, बाजीराव कदम, ठोंबरेवाडीच्या उपसरपंच सविता इंगळे, एकनाथ इंगळे आदींच्या हस्ते सुपुर्त करण्यात आले.
जळीतग्रस्त, पूरग्रस्त, धरणग्रस्त, आपत्तीग्रस्त, अतीवृष्टीग्रस्त यासह दिव्यांग बांधवांना शासनाच्या मदतीची वाट पहायला लावण्यापेक्षा स्वखर्चाने तातडीची मदत आ. शिवेंद्रसिंहराजे नेहमीच करत असतात. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ठोंरबेवाडीतील जळीतग्रस्तांनाही त्याच पध्दतीने तातडीची मदत दिली असून ही दोन्ही कुटूंबे सावण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाहीही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली आहे.
दरम्यान, केलेल्या मदतीबद्दल बाबर कुटूंबीयांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular