Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडीवाघमारे गुरुजींची विचारधारा विकासवादीः आ. शशिकांत शिंदे

वाघमारे गुरुजींची विचारधारा विकासवादीः आ. शशिकांत शिंदे

सातारा ः दिवंगत गो. मा. वाघमारे उत्तुंग विचारांचे व्यक्तिमत्त्व होते. पेशाने शिक्षक असले तरी त्यांच्या पत्रकारितेमुळे अनेकांना नवीन ओळख मिळाली. त्यांचा दृष्टीकोन विकासवादी होता. संघर्षातून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. सातारा जिल्ह्यातीलच नव्हेतर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक चळवळींशी त्यांचा चांगला संबंध होता. त्यांनी आपले आयुष्य समाजासाठी खर्ची केले,फ असे प्रतिपादन कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.शशिकांत शिंदे यांनी केले.
सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांना आ.शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते मगो. मा. वाघमारे स्मृती पत्रकारिता पुस्काराने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सभामंचकावर गो. मा. वाघमारे ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ. मंगलताई गायकवाड, कार्यवाह अरुण जावळे, ज्योती कुलकर्णी, सुनील वाघमारे, अनिल वाघमारे, कलावती वाघमारे, सेजल वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप होते. दरम्यान, कुलकर्णी यांनी पुरस्काराची रक्कम आणि स्वत:कडील काही रक्कम दिवंगत पत्रकार पांडुरंग पवार यांच्या कुटुंबियांना प्रदान करणार असल्याचे जाहीर केले.
आ. शिंदे यांनी वाघमारे गुरुजींच्या कार्याचा गौरव करतच विनोद कुलकर्णी यांचे पत्रकारिता, सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल कौतुक केले. ते म्हणाले, मवाघमारे गुरुजींनी संघर्षातून स्वत:ची ओळख निर्माण केली. त्यांनी आपले आयुष्य समाजासाठी खर्च करत असताना नेहमी वंचित घटकांचाच विचार केला. त्यांचा विचार सातत्याने तेवत ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. त्यांचा आदर्श ठेवूनच आपल्याला पुढील वाटचाल करायची आहे.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मवाघमारे गुरुजी हाडाचे शिक्षक होते. त्यांनी स्वत:च्या मुलींना उच्चशिक्षित तर केलेच, त्याचबरोबर समाजातील अन्य वंचित घटकांनाही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. गुरुजींना कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सहवास मिळाला. गुरुजी कोणतेही काम कृतीतूनच करुन दाखवत होते. जनसामान्यांच्या प्रश्नांविषयी त्यांना आस्था होती.
सत्काराला उत्तर देताना विनोद कुलकर्णी म्हणाले, मपत्रकारिता आणि सहकारक्षेत्रात कार्यरत असल्यामुळे अनेकांशी संपर्क आला. त्यातूनच घडत गेलो. राजकीय, सामाजिक, सहकारक्षेत्रातील लोकांशी आपुलकीचे नाते निर्माण झाले. गो. मा. वाघमारे यांची पत्रकारिता मी जवळून अनुभवली आहे. वाघमारे गुरुजी आदर्श व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या नावाने देण्यात येणारा पहिलाच पुरस्कार मिळाला, हे माझे भाग्य समजतो.पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रमास सातारा शहरातील मान्यवर, सहकारक्षेत्राशी संबंधित तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सेजल वाघमारे यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular