सातारा – पुणे महामार्गावरील जुन्या खांबाटकी टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला मालट्रक (क्रमांक के.एल.16 यु -4420) उभा होता. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी महिंद्रा बोलेरो जीप (क्रमांक एम-एच 47-एबी 1784) ही मालट्रकला पाठीमागून येऊन धडकली. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. तर दोघेजण गंभीर जखमी झाले.सावंतवाडीहून बोरीवलीकडे भरधाव वेगात निघालेली बोलेरो जीप रविवारी सकाळी पारगाव – खंडाळ्यानजीक महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.
सातारा -पुणे महामार्गावरील जुन्या खांबाटकी टोलनाक्याजवळ रस्त्याच्या कडेला मालट्रक (क्रमांक के.एल.16 यु -4420) उभा होता. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास भरधाव वेगाने येणारी महिंद्रा बोलेरो जीप (क्रमांक एम-एच 47-एबी 1784) ही मालट्रकला पाठीमागून येऊन धडकली. ट्रक व बोलेरो जीपच्या या भीषण अपघातात मुंबई येथील तीन जण जागीच ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाले. यामध्ये बोलेरो जीपचे मोठे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी की, विनायक कामत हे मुंबई महानगरपालिकेतील निवृत्त अधिकारी आपली पत्नी स्मिती कामत, मेहुणे बाळकृष्ण सामंत व विलास सामंत यांच्यासमवेत मुंबईहुन गावी सावंतवाडीला लग्नसमारंभासाठी गेले होते. लग्नकार्य उरकुन रविवारी पहाटे सावंतवाडी येथून मुंबईला निघाले. पुणे – बेंगलोर महामार्गावरून मुंबईकडे जाताना खांबाटकी बोगदा ओलांडून पुढे आल्यावर पारगांव -खंडाळ्यानजीक हा अपघात झाला.
या अपघातात विलास सामंत (मुळ राहणार पाट ता .कुडाळ जि. सिंधुदुर्ग), बाळकृष्ण शंकर सामंत (वय 66, रा. दहिसर मुंबई) व विनायक कामत (मुळ रा.तळवडे ता.सावंतवाडी) हे जागेवरच ठार झाले. तर कामत यांच्या पत्नी स्मिती कामत ( रा . तळवडे ता .सावंतवाडी) व चालक रवी गावकर (रा.जुहुसर्कल मुंबई ) हे दोघे गंभीर जखमी आहेत. स्मिती कामत यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. खंडाळा येथे खाजगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले.
जीप – मालट्रक अपघातात तीन जागीच ठार, दोघेजण गंभीर जखमी
RELATED ARTICLES