ट्रेकर्सच्या मदतीने काढला मृतदेह बाहेर
परळी : कासरस्थळ येथील चंद्रकांत शिवराम पिंपळे (वय 65) हे बेपत्ता होते.त्यांचा शोध सुरू होता.उरमोडी धरणात त्यांचा मृतदेह आढळून आला.पोलीस मित्र चंद्रसेन पवार व त्याचे सहकारी व छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स यांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढला.याची सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कासारस्थळ हे गाव उरमोडी धरणाच्या परिसरात आहे.याच गावातील चंद्रकांत शिवराम पिंपळे (वय 65) हे बेपत्ता होते.त्यांचे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते.दरम्यान, उरमोडी धरणाच्या खोलगट भागात त्यांनी आत्महत्या केली असावी या अनुषंगाने पोलीस मित्र चंद्रसेन पवार व त्याचे सहकारी व छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स ग्रुपला भर उन्हाच्या तडाख्यात प्रयत्न सुरू केले.त्यांच्या प्रयत्नांना यश आले.खोलगट भागातून मृतदेह बाहेर काढण्यासाठी या ग्रुप ला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कासरस्थळ सह परळी भागात हळहळ व्यक्त होत आहे. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे ट्रेकर्स व सर्व पोलीस मित्राचे सातारा पोलीस दलातर्फे स्वागत करण्यात आले.
उरमोडीत चंद्रकांत पिंपळे यांची आत्महत्या
RELATED ARTICLES