Sunday, June 22, 2025
Homeताज्या घडामोडीदि वाई अर्बन बँकेच्या नूतन इमारत बांधकामास प्रारंभ

दि वाई अर्बन बँकेच्या नूतन इमारत बांधकामास प्रारंभ

वाईः दि वाई अर्बन को. ऑप. बँक वाईमध्ये नवीन अत्याधुनिक प्रशासकीय इमारत बांधकाम करीत असून ग्राहक खातेदारांना बदलते अत्याधुनिक बँकिंगची सुविधा देण्याचा बँकेचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे यांनी केले.
बँकेच्या गणपती आळीतील अहिर सुवर्णकार समाज ट्रस्टच्या जागेवरील नवीन इमारत बांधकामाचा शुभारंभ बँकेचे माजी संचालक श्री. प्रभाकर गोखले यांच्या हस्ते व वेदमूर्ती शंकरराव अभ्यंकर यांच्या वैदिक मंत्रोच्चारांच्या उदघोषात करण्यात आला. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष काळे म्हणाले, बँकेने नुकताच व्यवसायाचा 1600 कोटी रूपयांचा टप्पा पार केला असून वाई शहराच्या नावलौकीकात भर घालणारी बँकेची सुसज्ज वास्तू बँक बांधीत आहे. त्यामध्ये पारंपरिक बँकिंग सोबतच आधुनिक बदलत्या बँकिंगला अनुसरून इमारतीची रचना करण्यात येणार आहे. सध्याच्या जुन्या इमारतीमध्ये वाहने पार्किंगची गैरसोय होते आहे. बँक बाजारपेठेत असल्याने वाहने ने- आण करताना अडचण निर्माण होत आहे. ग्राहकांना जलद व सोईस्कर बँकिंग सेवा देण्यासाठी कटिबध्द आहे. वाई अर्बन बँक ही महाराष्टातील नावाजलेली बँक असून बँकेला साजेशी इमारत बांधण्यात येत आहे. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक डॉ. विनय जोगळेकर, वाई अर्बन परिवाराचे प्रमुख पोपटलाल ओसवाल, अरूण देव, उपनगराध्यक्ष अनिल सावंत व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून इमारत बांधकामास सुरूवात करण्यात आली.प्रा. विष्णू खरे यांनी प्रास्ताविक केले. नरहरी महाबळेश्वरकर यांनी वेदिक मंत्रोच्चार केले. कार्यक्रमास बँकेचे माजी अध्यक्ष श्री. सतीश शेंडे, कांतीलाल जैन, अ‍ॅड. सूर्यकांत खामकर, पाचगणीचे डॉ. सुधीर बोधे, माजी संचालक अनंतराव शेवडे, मिलिंद भंडारे, कन्हैय्यालाल गांधी, नरहरी महाबळेश्वरकर माजी व्यवस्थापक रामचंद्र कानडे, बँकेचे संचालक मदनलाल ओसवाल, अ‍ॅड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, अ‍ॅड. सीए. राजगोपाल द्रवीड, विद्याधर तावरे, मनोज खटावकर, भालचंद्र देशपांडे, डॉ. शेखर कांबळे, स्वरूप मुळे, संचालिका सौ. अंजली शिवदे, सौ. गीता कोठावळे, तज्ज्ञ संचालक सीए. किशोरकुमार मांढरे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, अनिल देव, ज्येष्ठ साहित्यिक मधु नेने, किसन वीर साखर कारखान्याचे संचालक प्रवीण जगताप, बँकेचे स्थानिक शाखा सल्लागार यशवंत जमदाडे, नरेंद्र गांधी, आनंद शेलार, मिलिंद पुरोहित, अरूण पवार, प्रा. विवेक सुपेकर, प्रा. किशोर अभ्यंकर, प्रशांत नागपूरकर, अमोल शेवते, पत्रकार अ‍ॅड. रमाकांत वाघचौडे, अशोक येवले, संजय साबळे, बँकेचे उपसरव्यवस्थापक चंद्रशेखर काळे, संतोष बागुल, सहा. सरव्यवस्थापक आनंद पटवर्धन, प्रसाद कुंभारे, सुहास पानसे आदी अधिकारी व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular