Sunday, June 22, 2025
Homeताज्या घडामोडीसातार्‍यात आचार संहिता भंगच्या तक्रारीबाबत निवडणुक आयोगाच्या विरोधात उपोषण

सातार्‍यात आचार संहिता भंगच्या तक्रारीबाबत निवडणुक आयोगाच्या विरोधात उपोषण

सातारा : सातारा लोकसभा मतदार संघात आचार संहितेचा भंग होत असल्याच्याबाबत लेखी तक्रार केली होती. तरी सुद्धा कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ सामान्य निरिक्षक, सातारा लोकसभा मतदार संघ यांच्या सातार्‍यातील शासकीय विश्राम गृहातील दालनाबाहेर आज निवडणुक आयोगाच्या निषेधार्थ उपोषण करण्यात आले. यामुळे खळबळ माजली असून उपोषण कर्त्यांची मनधरणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय झाली होती. पण उपोषण कर्ते ठाम राहिल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
सातारा लोकसभा मतदार संघातील निवडणुकीबाबत आचार संहिता भंगच्या चार तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. या तक्रारीमध्ये सरकारी अधिकारी व राजकीय पक्षातील पदाधिकारी सहभागी असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. 12 मार्च 2019 रोजी सातारा नगर परिषद स्थायी समितेच्या रेकॉर्ड तातडीने ताब्यात घेत अहवाल तात्काळ सादर करावा. आचार संहिता काळात नगर परिषद सभांचे इतिवृत्त लिहण्याचे काम सुरू आहे. तसेच प्रोसिडिंग लिहण्याचा व कराड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यशवंत डांगे यांना सोन्याच्या धातूचा मौल्यवान दागिना आणि भेटवस्तू स्विकारली आहे. कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन या ठिकाणी महिलांसाठी पैठणी क्विन स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये कराड परिसरातील महिलांनी सहभाग घेतला होता. सदरची स्पर्धा एका राजकीय पक्षातील उमेदवाराच्या प्रचारार्थ घेण्यात येवून सुद्धा कराड नगर परिषदेने शुल्क न आकारता या कार्यक्रमाला सुट दिली.
अशा अनेक बाबींची तक्रार होवून सुद्धा कारवाई होत नाही, याचा निषेध नोंदवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ओमकार तपासे, सातारचे भाजप नगर सेवक धनंजय जांभळे, विजय काटवटे, महारूद्र त्रिंकूडे हे शासकीय विश्राम गृहातील सातारा लोकसभा निवडणुकीतील सामान्य निरिक्षक श्री झा यांच्या सातारा विश्राम गृहातील दालना बाहेर उपोषणाला बसले आहेत. मत मोजणीसाठी एक दिवसाचा अवधी असतानाच सातारा लोकसभा निवडणुकीत आचार संहिता भंगबाबत देशातील निवडणुक आयोगाच्या निषेधार्थ उपोषण करण्याची वेळ कार्यकर्त्यावर आलेली आहे. याची गंभीर नोंद निवडणूक आयोगाने न घेतल्यास सातार्‍यातील मतदार लोकांचा लोकशाही वरील विश्‍वास उडेल.
त्यामुळे या प्रकरणाची त्वरीत चौकशी करून दोषींवर कारवाई होई पर्यंत याचा पाठपुरावा केला जाईल अशी माहिती उपोषण कर्त्यांनी दिली. यावेळी सातारा शहर पोलीस निरिक्षक प्रितम कुमार जाधव व त्यांचे सहकारी बंदोबस्त सोबतच उपोषण कर्त्यांची मनधरणी करीत होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular