कराड : श्री संतकृपा शिक्षण संस्था घोगाव (ता.कराड) संचलित श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म या महाविद्यालयात नुकत्याच वेलनेस फोरेवर मेडिसिन लिमिटेड मुंबई या मेडिसिन कंपनी द्वारे कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात आला.
या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सातारा व सांगली जिल्ह्यातील सहा फार्मसी महाविद्यालयातील एकूण 73 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामधील बत्तीस विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या यशस्वी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मुंबई-पुणे-नाशिक याठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. वेलनेस फोरेवर मेडिसीनचे एचआर मॅनेंजर प्रियांका पवार, योगेश हरिचंद्र, एचआर,असो मॅनेजर प्रसाद पुनवलकर, प्रतीक चव्हाण यांनी या निवड प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला होता. या कॅम्पस इंटरव्ह्यू चे आयोजन डी फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली महाडिक यांनी केले होते. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी व आकर्षक वेतन मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष शशिकांत पाटील उपाध्यक्ष डॉ.उषा जोहरी, सचिव प्रसुन्न जोहरी, सीईओ प्रदीप कबाडे, प्राचार्या वैशाली महाडीक यांनी अभिनंदन केले.
श्री संतकृपा डी फार्मसीमधील 32 विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये निवड
RELATED ARTICLES