पाटण:- २०१९ सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच सातारा लोकसभा मतदार संघाचे विजयी उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी निकालाच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी १० वा. पाटणला येऊन कौलेज मित्र सत्यजितसिंह पाटणकर यांच्या निवासस्थानी जाऊन गळाभेट घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ट नेते विक्रमसिंह पाटणकर यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांचे बंधू जि.प. सदस्य रमेश पाटील यांची उपस्थिती होती. महाराजांनी “पाटणला दिला शब्द पाळणार सत्यजितसिंहाना आमदार करणार” अस सुचक सुचवल. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तर महाराजांनी निकालानंतर पहिली भेट अचानक पाटणला दिल्याने अनेकांच्या भुवया उडाल्या. या भेटीत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पाटणचे सिध्दीविनायकाचे दर्शन घेऊन पुजा केली. तर रामापूर येथील मुस्लिम बांधवानां रमजान च्या दिल्या शुभेच्छा.
२३ मे रोजी गुरवारी सायंकाळी उशिरा सातारा लोकसभा मतदार संघाचा निकाल संपताच छत्रपती उदयनराजे भोसले सर्वाधिक एक लाख च्यावर मताधिक्याने निवडून आलेचे जाहीर होताच पाटण मधे त्यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची अतिशबाजी व गुलालाची उधळण करत जल्लोष केला. मात्र सातारा लोकसभा मतदार संघातील पाटण विधानसभा मतदार संघातून पाटणचे स्थानिक भुमिपुत्र प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांना मताधिक्य मिळाल्याने छत्रपती उदयनराजे महाराज पाटणवर नाराज असतील आस अनेकांनी भाकीत केले. मात्र तसे न होता. गुरवारी अतिंम निकाल जाहीर होताच. दुसऱ्या दिवशी पाटणला जाणार असल्याचे संकेत महाराजांनी दिले होते. पण महाराज पाटणला नक्की येणार अस हि कोणी ठाम सांगत नव्हते. छत्रपती महाराज ते महाराजच त्यांनी दिलेल्या संकेताप्रमाणे शुक्रवारी सकाळी १० वाजता पाटण नगरीत आगमन केले. व थेट ते कौलेज मित्र सत्यजितसिंह पाटणकर यांचे निवासस्थानी जाऊन त्यांची गळाभेट घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ट नेते माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचेअशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या सोबत प्रतिस्पर्धी उमेदवार नरेंद्र पाटील यांचे बंधू जि. प. सदस्य रमेश पाटील देखील हजर होते. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील छत्रपती उदयनराजे महाराजांच्या स्वागताला गर्दी केली होती. महाराजांनी देखील “पाटणला दिला शब्द पाळणार.. सत्यजितसिंहानां आमदार करणार…” असल्याच सुचक सुचवलं. असता कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
खा. छत्रपती उदयनराजे भोसले यांचे सत्यजितसिंह पाटणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन आणि स्वागत केले. यावेळी जि. प. सदस्य रमेश पाटील, पाटण पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजाभाऊ काळे, यशवंतराव जगताप, छत्रपती उदयनराजे भोसले फौंडेशन चे पाटण तालुका अध्यक्ष नितीन पिसाळ,दिनकरराव घाडगे, सुभाष पवार आदी कार्यकर्त्यासंह मोठ्या संख्येने युवक नागरिक उपस्थित होते.