साताराः नव्या पोलीस वसाहतीचे खोदकाम सुरू असताना पोलीसांना ऐतिहासिक तोफ सापडली असून या तोफेचे वजन सुमारे साडेतीनशे किलो आहे. ही तोफ पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होवू लागली आहे.
पोलीस मुख्यालयाजवळील पोलीस वसाहतीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पोलीसांची जुनी वसाहत याठिकाणी होती. जेसीबीच्या साह्याने जुन्या वसाहतीच्या भिंतीचे दगड हटवून त्या ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. नेहमीप्रमाणे हे काम सुरू असताना रविवारी मोठया खड्यामध्ये तोफ असल्याचे पोलीसांच्या निदर्शनास आले. याठिकाणी ऐतिहासिक तोफ असल्याची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेवून तोफेची पाहणी केली. त्यानंतर जेसीबीच्या साह्याने ही तोफ वर काढण्यात आली. एका जागेवरून दुसर्या जागेवर ही तोफ एकटया दुकटया माणसाला हवलता येत नाही. हा ऐतिहासिक ठेवा खोदकामात सापडल्याने या तोफेचे कुतूहल आणखीनच वाढले आहे ही तोफ पाहण्यासाठी गर्दी केली हेाती.
ही तोफ छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आणि धातूपासून बनवली असावी असे इतिहास तज्ञांचे मत आहे.
सातार्यात साडेतीनशे किलोची ऐतिहासिक तोफ सापडली
RELATED ARTICLES