Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीमाजी सहकारमंत्री विलासराव पाटील (काका) यांची धनगरवाडयास सदिच्छा भेट

माजी सहकारमंत्री विलासराव पाटील (काका) यांची धनगरवाडयास सदिच्छा भेट

तळमावलेः .ना कोणती निवडणूक…ना कोणता वैयक्तिक अथवा सार्वजनिक कार्यक्रम.भविष्यातील निवडणूकीच्या मोर्चेबांधणीसाठी आले असावेत तर मतदारसंघ बदललेला.सोबत कोणत्याही प्रकारच्या कार्यकर्त्यांचा फौजफाटा नाही. गाडयांची रेलचेल नाही. ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी आपण येणार आहोत याची पुसटशी कल्पनाही दिली नव्हती. अशातच सायंकाळच्या रम्य वेळी त्यांचे आगमन झाले. ते आले.त्यांनी पाहिले आणि त्यांनी जिंकले असेच याबाबत म्हणावे लागेल. माजी सहकारमंत्री विलासराव पाटील (काका) यांच्याबाबतीत हे वर्णन आहे. विशेष म्हणजे या सदिच्छा भेटीवेळी एकही राजकीय पुढारी काकांच्या सोबत नव्हता. दरम्यान, काकांनी या गावातील ज्येष्ठ नागरिकांचा उभयता पोशाख देवून सत्कार केला.
काही दिवसापूर्वी विलासकाका आणि त्यांचा नातू यांनी पाटण तालुक्यातील धनगरवाडा (काळगांव) या ठिकाणी भेट दिली. कसलाही गाजावाजा नाही, कोणताही कार्यक्रम नाही असे असताना अचानक विलासकाका आलेले पाहून धनगरवाडयावरील अबालवृध्द भारावून गेले. सर्वजण हरखून गेले. काय करावे हे समजत नव्हते. धनगरवाडयामध्ये असलेल्या छोटयाशा मंदीराबाहेर ते बसले होते. बसल्यानंतर जुन्या आठवणींचा फड रंगला. या विभागाने पाटण मतदारसंघ दक्षिण मध्ये जाण्यापूर्वी एकमुखी साथ दिली आहे. काकांनीदेखील या भागातील मुलभूत सुविधा सोडवत असताना शाश्‍वत विकास करण्याचे काम केले आहे. सुमारे 20 वर्षापूर्वी हा बदल झाला आहे. असे असतानादेखील जुन्या लोकांच्या आठवणीमुळे त्यांना भेटण्यासाठी काका या ठिकाणी आले होते. प्रत्येकाची आवर्जून ते विचारपूस करत होते…अमका कुठे आहे…तमका कुठे गेला आहे.हा दिसेना.तो दिसेना अशी प्रत्येक घरातील नावाला आणि त्याच्या परिवाराला काका ओळखत होते.
या छोटयाशा वाडी वस्तीवर उर्जा निर्माण करण्यासाठी, लोकांनी माझ्यावर केलेेले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण याठिकाणी आलो आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही. निस्वार्थ भावनेने लोकांना खास भेटण्यासाठी या ठिकाणी आलो आहे अशी प्रतिक्रिया विलासराव पाटील (काका) यांनी व्यक्त केली.
बर्‍याच कालावधीनंतर काका गावी आले आहेत हे पाहून त्यांनी काकांचा सत्कार घेण्याचे ठरवले. हे कळताच काका म्हणाले, मी सत्कारासाठी नाही तर फक्त तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहे, त्यामुळे मी हा सत्कार स्वीकारणार नाही.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular