फलटण: मंगळवार दि.28 मे रोजी रात्री झालेल्या साठेफटा व सुरवडी ता.फलटण येथे अज्ञात वाहनांच्या दोन विविध अपघातात दोघे ठार झाले आहेत.
याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्यातून दिलेल्या माहितीनुसार साठे फाटा येथे अनुराग ढाब्याजवळ समोरून येणार्या अज्ञात मोटारसायकल चालकाने गणेश अरुण चव्हाण (वय 32) रा.साठेफटा ता.फलटण यांच्या मोटारसायकलला धडक दिली. यामध्ये ते ठार झाले असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास स.पो.निरीक्षक संजय बोंबले करीत आहेत.
तसेच सुरवडी (ता.फलटण) येथे हॉटेल रॉयल पॅलेस समोर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने निर्भय कुमार द्विवेदी (वय 30 वर्षे) रा.तालाब (उत्तरप्रदेश) यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना अधिक उपचारासाठी नेत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अधिक तपास स.पो.नि.नागटीळक करीत असून या दोन्ही अपघातांची नोंद फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.
याचबरोबर फलटण येथे मध्यवर्ती असलेल्या डेक्कन चौक येथे जुने गुलमोहर झाड पडून एका तीन चाकी रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नेहमीच गजबजलेल्या ठिकाणी हे झाड आज बुधवार दि.29 रोजी पडले. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. याबाबत अजून तक्रार दाखल करण्यात आली नाही, असे शहर पोलीस ठाण्यातुन सांगण्यात आले आहे.
फलटणमध्ये वेगवेगळ्या अपघातात दोन ठार
RELATED ARTICLES