जोशीविहीरःदिनांक 25 मे 2019 ला श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या बिंझर येथील न्यू इंग्लिश स्कुल व ज्युनि.कॉलेज भाग शाळा मंजाई आसनी येथे इयत्ता 9 वी व 10 वीच्या विद्यार्थ्यांना निसर्ग महिला बाल कल्याण व कृषी विकास संस्था खानापूर आणि अखिल रयत सेवक क्रांतीकारी संघ रोस्टम इंडिया सोसीअल ऑर्गनायझेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 35 विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे शिवाजी भोसले व प्रमुख पाहुणे सरपंच मुकुंद मराठे होते.
निसर्ग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या प्रसंगी म्हणाले दुर्गम डोंगरी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची गरज लक्षात घेऊन सामाजिक कार्यास ही संस्था सदैव सहकार्य करेल. या संस्थेने शेतकरी या बरोबरच विद्यार्थी व माणसे जोडण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रसंगी अखिल रयत सेवक क्रांतीकारी संघ रोस्टम इंडिया सोसीयल ऑर्गनायझेशनचे प्रशांत खाडे यांनी मनोगतामध्ये कौशल्य विकसीत करण्याचा सल्ला देवून 100 वृक्ष लागवडीस रोपे देण्याचे जाहीर केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना शिवाजी भोसले म्हणाले की विद्यार्थी हित पाहून दुर्गम भागात बापूजीनी शाळा सुरू केल्याने मुलांना शिक्षणाची सोय झाली. स्थलांतरामुळे विद्यार्थी संख्या कमी होत चालली आहे.येथे वस्तीगृहाची गरज आहे.
प्रास्ताविकात प्राचार्य बी.डी.मोरे यांनी संस्था व शाखा विषयी माहिती दिली. या प्रसंगी निसर्गचे हनुमंत कुंभारकऱ संजय फडतरे़ राघव भागवत़ किरण फरांदे़ प्रसाद सर्वगोड़ ग्रामपंचायत सदस्या सीमा मराठ़े बाळू ढेबे़ माने इत्यादि उपस्थित होते.
निसर्ग रोस्टम तर्फे म.आसनीत पुस्तक वाटप संपन्न
RELATED ARTICLES