वाईः गोव्याचे मुख्यमंत्री ना. डॅा.प्रमोद सावंत यांच्या हस्ते दि वाई अर्बन बँकेचे अध्यक्ष, किसनवीर सातारा सहकारी साखर उद्योग समूहाचे ज्येष्ठ संचालक व सहकार भारती सातारा जिल्हाध्यक्ष चार्टर्ड अकौटंट चंद्रकांत काळे यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्यावतीने देण्यात आलेल्या सहकार भूषण दि प्राईड आँफ इंडीया भास्कर अॅवार्ड या पुरस्काराने नुकतेच पणजी येथे गौरविण्यात आले. सीए. चंद्रकांत काळे यांच्या सामाजिक, बँकिंग व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनने त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पणजी येथील दिनानाथ मंगेशकर कला अकादमीमध्ये झालेल्या गौरव समारंभास माजी केंद्रीय कायदामंत्री अँड.रमाकांत खलप, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भगिनी वासंतीबेन मोदी, सामाजिक कार्यकर्त्या सारिका मिंडा, महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनचे संस्थापक राजेंद्र लोहार यांची व्यासपिठावर प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री ना.सावंत म्हणाले, सामाजिक क्षेत्रात काम करणार्या प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही फळाची अपेक्षा न करता कार्य करीत राहावे, महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनसारख्या सामाजिक संस्था आपल्या कार्याची दखल घेत असतात. महाराष्ट्राच्या कानाकोपर्यांतील सामाजिक कार्यकर्त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या पंखांना बळ देण्याचे काम जर्नालिस्ट फौंडेशन करीत आहे. ही खूपच गौरवास्पद बाब आहे. फौंडेशनने यापुढील काळात ही मोठ्या जोमाने काम करेल, गोवा सरकार त्यांना मदतीचा हात देत राहिल. सीए. चंद्रकांत काळे सहकार, बँकिंग व सामाजिक क्षेत्रांत करीत असलेल्या कार्याचा गौरव ही मुख्यमंत्री डाँ. सावंत यांनी आपल्या भाषणांत आवर्जून उल्लेख केला.
याप्रसंगी डॉ. सावंत यांच्या हस्ते सीए. चंद्रकांत काळे यांना मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमास सीए. काळे यांच्या सुविद्य पत्नी सौ.सुवर्णा काळे, बँकेचे उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी, संचालक मदनलाल ओसवाल, अँड. प्रतापराव शिंदे, विवेक भोसले, मनोज खटावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार दत्ता मर्ढेकर, उद्योजक अशोक मोरे, यशवंत जमदाडे व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात देशभरातील विविध भागातील कार्यकर्त्यांना मुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरविण्यात आले.याप्रसंगी अॅड.खलपयांनी ही पुरस्कारार्थींचे अभिनंदनपर भाषण केले.सहकार भूषण पुरस्कार मिळालेबद्दल सीए. चंद्रकांत काळे यांचे वाई अर्बन परिवाराचे प्रमुख पोपटलाल ओसवाल, अरूण देव, डॅा.सुधीर बोधे, बँकेचे ज्येष्ठ संचालक डॅा.विनय जोगळेकर, विद्याधरतावरे, प्रा.विष्णू खरे, भालचंद्र देशपांडे, डॅा.शेखर कांबळे, स्वरूप मुळे, संचालिका सौ.अंजली शिवदे, सौ.गीता कोठावळे, सीए. किशोरकुमार मांढरे, सीए. डी.बी.खरात, अविनाश जोशी, प्रवीण जगताप, नितिन जगताप व मान्यवरांनी अभिनंदन केले.