वडूज : येथील हनुमान मंदिरात प्राथमिक आरोग्य केंद्र कातरखटाव यांच्या वतीने राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम (एन. सी .डी.) संपन्न झाला.
यावेळी कातरखटाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली चव्हाण यांनी या आरोग्य तपासणी शिबिराबाबत रुग्णांना रक्त दाब, मधुमेह,केन्सर, पक्षघात याबाबत उपचारांचीमाहिती दिली. या शिबिरात 340रुग्णाची तपासण्या करण्यात आल्या.रक्तदाबाचे10रुग्ण,मधुमेह असणारे 7 नवीन रुग्ण सापडले त्यांना डॉ.जान्हवी गायकवाड यांनी औषध उपचार व आजाराविषयी मार्गदर्शन केले. यावेळी बंडगर, माने,श्रीमंती पलुस्कर,मिसाळ,ढोबळे,खरमाटे,गोडसे,भिसे,पंडीत, बोरावणे आदी आरोग्य कर्मचार्यांनी सहभाग घेतला.या शिबिरास नगरपंचायत व ग्रामीण रुग्णालय वडूज यांनी सहकार्य केले.आशा स्वयंसेवक यांनी उत्कृष्ट नियोजन केले.आभार जयप्रकाश पाटील यांनी मानले.
वडूज येथे राष्ट्रीय असंसर्गजन्य नियंत्रण कार्यक्रम संपन्न
RELATED ARTICLES