सातारा : भारतात देशभक्तांची शृखंला आहे, पण सावरकर कुटुंबियांनी केलेला त्याग अनन्य साधारण आहे. देशभक्तीचे दुसरे नांव स्वातंष्यवीर वि.दा. सावरकर आहे असे विचार महामंडलेश्वर डॉ. रघुनाथजी महाराज देवबाप्पा तथा फरशीवाले बाबा यांनी व्यक्त केले. देवबाप्पा स्वा. सावरकर जयंती निमित्त अखिल भारत हिंदू महासभा सातारा जिल्हा आयोजित स्वा. सावरकर भक्त मेळावा व पुरस्कार प्रदान सोहळयात बोलत होते ते पुढे म्हणाले की इंग्रजी, उर्दु अशा शब्दाना पर्यायी मराठी शब्द स्वा. सावरकरांनी दिले. आज आपण सहज बोलतो ते नगरसेवक, महापोर, विधिमंडळ, महाविद्यालय, दिग्दर्शक, निर्माता, आमदार, बोलपट, चित्रपट, हुतात्मा इत्यादी असे हजारो शब्द सावरकरांनी मराठी भाषेला दिले. स्वा. सावरकरांनी केलेल्या समाज सुधारणा विसरता येणार नाही. 90 वर्षापुर्वी रत्नागिरी येथे सर्व हिंदु बांधवासाठी त्यांनी पतित पावन मंदिर उभे केले. जातपात विरहित हिंदू समाज घडविण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. अशा या महामानवाच्या विचारांचे आपण आचरण केले पाहिजे व कृतीत आणले पाहीजेत. स्वा. सावरकरांच्या प्रतिमेला डॉ. रघुनाथ महाराज देवबाप्पा यांनी पुष्पहार अर्पण केला. स्वा. सावरकर भक्त मेळाव्याचे उदघाटन त्यांच्या व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिवक्ता गोविंद गांधी, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश हिदूं महासभा यांनी केले. प्रास्ताविक अधिवक्ता दत्ता सणस जिल्हाध्यक्ष हिंदू महासभा यांनी केले. स्वा. सावरकर पुरस्कारार्थींचा सन्मान – सन्मानपत्र, शाल, हार, श्रीफळ देवून करण्यात आला.या मेळाव्यात वि.ल. चाफेकर यांना स्वातंष्यवीर सावरकर समाजभूषण पुरस्कार श्री. वसंतशेठ जोशी यांना स्वा. सावरकर उद्योगभूषण पुरस्कार, सहकारभूषण पुरस्कार रणजित देशमुख, कलाभूषण पुरस्कार श्रीनिवास कांबळे व हिंदूभुषण वासुदेवराव रेडकर पुरस्कार केशवराव साठे यांना प्रदान करण्यात आला. सत्कारास उत्तर देताना वि.ल. चाफेकर म्हणाले की हा पुरस्कार मी आयुष्यभर समाजसेवेचे काम करीत आलो त्याची पावती आहे. आजही मी माझ्या परीने कार्य करीत आहे. आपले मनोगत व्यक्त करताना स्वा. सहकारभूषण पुरस्काराचे मानकरी रणजित देशमुख म्हणाले की, स्वा. सावरकरांचा पुरस्कार मला आयुष्यभर प्रेरणा देत राहील. स्वा. सावरकर असामान्य व्यक्तीमत्व होते. मी माण खटाव या दुष्काळी भागात कार्य करीत आहे. सूत गिरणी, साखर कारखाना, बचतगट इ. विविध संस्थांच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार मिळवून दिला आहे. पाणी प्रश्न असो अथवा कोणताही प्रश्न असो मी व माझे सहकारी संघर्ष करण्यास तयार आहे. स्वा. सावरकरांच्या पुरस्काराने मला संजिवनी मिळाली आहे. कलाभूषण पुरस्कार प्राप्त श्रीनिवास कांबळे म्हणाले की, माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. स्वा. सावरकरांच्या नावाचा कलाभूषण पुरस्कार मला अखिल भारत हिंदू महासभेने दिला व माझ्या कलेचे, अभिनयाचे सार्थक झाले. स्वा सावरकरांच्या विचारांची प्रेरणा नेहमी मिळत राहील. मेळाव्यात स्वा. सावरकर उद्योग भूषण वसंतशेठ जोशी, हिंदूभूषण पुरस्कारार्थी केशवराव साठे यांनीही विचार व्यक्त केले. निवास कांबळे यांनी काढलेल्या स्वा. सावरकरांच्या चित्राचे अनावरण महामंडलेश्वर डॉ. रघुनाथजी महाराज देवबाप्पा व मान्यवरांच्या हस्ते झाले. पेालीस मित्र पुरस्कार मोहन पुरोहित यांना मिळाल्याबददल देवबाप्पा याच्या हस्ते हार, शाल, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. स्वा. सावरकर मेळाव्यास वि.म. काळे, जोतिबा देवस्थानचे विश्वस्त प्रविण भोसले महाराज, सेवागिरी देवस्थानचे विश्वस्त संजय जाधव, प.पू. विसापूरे महाराज तथा मोैनी महाराज, प.पू. कुंभार महाराज, गिते व सौ. शिला गिते, प्रसाद चाफेकर, माजी नगराध्यक्ष अच्युत गोडबोले, सौ. मिनल शहा, विजय जोशी, रामभाऊ जमदाडे, ह.भ.प. सापते महाराज, सुनिल मोरे, यशवंतराव बाबर, सौ. माधुरीताई दिक्षित, मंगलसिंह राजपुरोहित, श्रीमंत झांजुर्णे, नितिन नारकर, राहुल कोल्हापुरे, भंवरलाल जैन, मुलचंद ओसवाल, रणधिर जाधव, राजुभाई मुलाणी, सत्यवान कांबळे, डॉ. संतोष गोडसे, पृथ्वीराज गोडसे, बाबा गोसावी, निलेश घार्गे वस्वा. सावरकर प्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते. धनराज जगताप यांनी सुत्रसंचालन केले. अधिवक्ता सतीश खानविलकरांनी उपस्थितांचे आभार मानले.
देशभक्तीचे दुसरे नांव स्वातंत्र्यवीर सावरकरःडॉ. रघुनाथ महाराज
RELATED ARTICLES