Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमाण, खटाव व फलटण तालुक्यातील 66 चारा छावण्यांचीअधिकार्‍यांकडून तपासणी

माण, खटाव व फलटण तालुक्यातील 66 चारा छावण्यांचीअधिकार्‍यांकडून तपासणी

सातारा : टंचाईच्या उपाययोजनांसाठी माण, खटाव व फलटण तालुक्यातील सुरु असलेल्या 66 चारा छावण्यांची जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या आदेशानुसार तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकार्‍यांमार्फत अचानक तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती माणचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली आहे.
चारा वाटपाच्या वेळेस म्हणजे सकाळी 8 वाजता चारा छावणी तपासण्यास सुरुवात करण्यात आली. तपासणी अधिकार्‍यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जनावरांच्या संख्येत कोठेही फरक नसल्याचे आढळून आले. कंपाऊड नसणे, बारकोडींग नसणे, मिनरल मिक्शर चे वाटप न करणे इत्यादी त्रुटी काही छावण्यांवर आढळून आल्या आहेत. भाटकी येथील चारा सोडून उर्वरीत सर्व छावणी चालकांना चारा छावणीतील पशुधनावर बार कोडींग करण्याच्या सक्त सूचना छावणी चालकांना तपासणी वेळी देण्यात आलेल्या आहेत, असेही प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular