परळीः सह्याद्रीच्या कुशीत सज्जनगड आणि परळी विभाग वसला आहे. शिव- समर्थ यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या परळी विभागाचे नेतृत्व करणारे गावं म्हणून ज्याची ओळख आहे अशा नित्रळ गावांत उपरोक्त मंडळाच्या वतीने गेली 46 वर्षे अविरत व अखंड सालाबादप्रमाणे वार्षिक श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली होती. अध्यक्ष सचिन वांगडे यांच्या अध्यक्षतेखाली कमेटीचे सहकार्य आणि सल्लागार अरुण वांगडे, चंद्रकांत वांगडे, सुभाष वांगडे, किरण वांगडे, रविंद्र वांगडे यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीपणे संपन्न झाली.
सकाळी ठिक 9:00 वाजता गावातील सर्व ग्रामदैवतांचे पुजन अर्चना करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळी 11:00 वाजता बबन लक्ष्मण गुरव गुरूजी यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा शांततेत पार पडली. यावेळी लहान मुलांच्या कला व क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी मंडळाच्या वतीने नित्रळ प्रिमियर लीग छझङ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या सत्रात क्रिकेट सामने खेळविण्यात आले. लहान थोर अशा सर्वांनी सहभाग घेऊन स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद घेतला. या वेळी प्रत्येकातील एक खेळाडू मात्र जागा झाला.
सायंकाळी सात वाजता मान्यवर व्यक्तींचा संयुक्त सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसह्याद्री परिवार संस्थापक , सातारा सहकारी बँकेचे अध्यक्ष ,तरूणांचे प्रेरणास्थान भाई वांगडे, गोसावी सर, बबन देवरे, वसंत भंडारे, अशोक माने, रविंद्र भंडारे सर, महेंद्र शेठ देवरे,माजी सरपंच चंद्रकांत वांगडे दादा , सरपंच लक्ष्मी रामचंद्र पवार, उपसरपंच सखाराम वांगडे, माजी सरपंच तानाजी वांगडे ग्रामपंचायत सदस्य , श्री केदारनाथ गृहनिर्माण सहकारी संस्था , सदस्य, श्री. सिद्धीविनायक मित्र मंडळ कमेटी व कार्यकर्ते ,ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ,यांच्या उपस्थितीत कै.रावसाहेब भाऊसाहेब वांगडे ( मास्तर )यांच्या पुतळ्यास आदरणीय भाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रम सुरू करण्यात आला. तसेच युपीएल प्रीमियम लिगमध्ये विक्रमी खेळी करणारे व गावचे नावं रोशन करणारे नित्रळ गावचे सुपुत्र,शान, अभिमान हिरो या नावाने प्रसिद्ध असलेले नितिन यशवंत वांगडे यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात आला.
मान्यवर व्यक्तीचे स्वागत व सुत्रसंचालन नितीन पवार यांनी केले. मान्यवर व्यक्तीचा शाल , श्रीफळ व रोपवाटिका देऊन झाडे लावा , झाडे जगवा असा एक आगळा वेगळा नैसर्गिक संदेश देण्यात आला. व सत्कार सोहळा संपन्न झाला. उपस्थित मान्यवर मंडळींनी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन करण्यात आले.
सौभाग्याचं लेणं हळदी कुंकू महिलांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंडळाच्या वतीने नवविवाहित जोडप्यांना सौ.जुही उमेश वांगडे आणि सौ.भारती उमेश वांगडे यांना भेट वस्तू देऊन त्यांच्या हस्ते उपस्थित महिलांना भेट वस्तू देण्यात आली.
महिलांसाठी विविध प्रकारच्या मनोरंजक स्पर्धा, गप्पा, सुसंवाद होम मिनिस्टर फेम सुत्रसंचालक सुरेशजी निकम साहेब भावजी यांच्या नेतृत्वाखाली होममिनिस्टर सत्र पहिले अतिशय सुंदर आणि नियोजनबद्ध कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. यावर्षी होममिनिस्टर विजेता सौ.स्वाती उमेश जाधव सांबरवाडी व उपविजेता सौ.स्वाती अभिजित वांगडे नित्रळ यांनी नंबर पटकावले.भव्य लकी ड्रॉ मध्ये सौ.उज्वला विजय वांगडे यांना बक्षीस मिळाले. बहुसंख्येने महिलांनी सदर कार्यक्रमात सहभाग घेतला होता. सदर कार्यक्रमाकरीता गौरी सिल्क साडी कळवा – ठाणे यांच्या वतीने प्रथम पारितोषिक पैठणी देण्यात आली.
श्री. सत्यनारायण महापूजा महाप्रसाद वाटप करण्यात आले. उपस्थित सर्वांनी तिर्थ प्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला. रात्री ठिक. 10:30 वाजता सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रम लहान मुलांचे रेकॉर्ड डान्स आयोजित करण्यात आले होते . गावातील लहान मुलांमधील कला गुण विकसित करण्याचा व सांस्कृतिक वारसा जोपासण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला . या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे जेष्ठ कलाकार सन्माननीय सुरेशजी निकम साहेब ,चंद्रकांत वांगडे, विनायक वांगडे यांनी सदाबहार मराठी व हिंदी गाणी, विनोद, सूत्रसंचलन व प्रश्नावली अशा विविध प्रकारच्या धमाल गप्पा गोष्टी करून कार्यक्रमाचे छानच सादरीकरण केले.
तसेच संपूर्ण स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले .तसेच या वर्षी मंडळाच्या वतीने श्री केदारनाथ गोंधळात उपस्थित भक्त भाविकांसाठी थंडगार पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
शुक्राचार्य सेवा मित्र मंडळाची वार्षिक सत्यनारायण महापूजा उत्साहात
RELATED ARTICLES