Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकिसन वीरवर वृक्षारोपणाने पर्यावरण दिन साजरा

किसन वीरवर वृक्षारोपणाने पर्यावरण दिन साजरा

भुईंज : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील ईटीपी परिसरात साताराचे अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांच्या हस्ते व भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुवा आणि संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीत सप्तपर्णीचे वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरणदिन साजरा करण्यात आला.
मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान संचालक मंडळाने वृक्ष लागवड, पर्यावरण रक्षण आणि त्याचे संवर्धन करताना कार्यस्थळावर आंबा, आवळा, सिताफळ, चिंच, पेरू, ड्रॅगन फ्रुट, अ‍ॅपल बोर, जांभुळ ही फळझाडे व ताम्हण या राज्यवृक्षासह टेबुबिया, पिवळा-पांढरा चाफा, सोनचाफा, गोरखचिंच, महोगणी, बहावा, कांचन, पुत्रंजीवा, कैलासपती, लेजेस्टिया, कदंबा, बोटलपाम, स्पॅथोडीया, बकुळ, पळस, सावर, पिंपळ अशी सुमारे तीस हजार झाडे सत्तर एकर क्षेत्रात लावलेली आहेत. ही झाडे नुसती न लावता ती चांगल्या पद्धतीने शंभर टक्के जगविण्यात आलेली आहेत.
आज जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षवल्ली आम्हा सोयरे…, या जगद्गुरू तुकोब्बारायांच्या अभंगाच्या गजरात सप्तपर्णी जातीची झाडे लावण्यात आली.
यावेळी किसन वीर कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम, चंद्रसेन शिंदे, कार्यकारी संचालक अशोक जाधव, प्रतापगड कारखान्याचे कार्यकारी संचालक एस. वाय. महिंद, इनचार्ज अ‍ॅग्री मॅनेजर विठ्ठल कदम, इन्चार्ज ऊस विकास अधिकारी ए. जे. ढमाळ, डेप्युटी डिस्टीलरी इन्चार्ज यु. के. जाधव, पर्यावरण अधिकारी सहदेव पवार, इन.परचेस अधिकारी राजेंद्र भोईटे, विशाल सावंत, अविनाश सांवत, शेखर भोसले-पाटील, सुनील शिवथरे, हणमंत गायकवाड, विनोद जाधव, सागर भिंताडे, कारखान्याचे सभासद,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular