Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीज्ञानाची शिदोरी उपक्रमास सहकार्य करण्याचे सेलिब्रिटींचे आवाहन

ज्ञानाची शिदोरी उपक्रमास सहकार्य करण्याचे सेलिब्रिटींचे आवाहन

तळमावलेः ग्रामीण भागातील गरजू होतकरु मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य देता यावे यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ज्ञानाची शिदोरी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या उपक्रमास दानशूरांनी मदत करण्याचे आवाहन मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत सेलिब्रिटी स्टार्सनी केले आहे. पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे यांच्या संकल्पनेतून ज्ञानाची शिदोरी हा उपक्रम सुरु झाला आहे. गेली 4 वर्षे अशाप्रकारचे शैक्षणिक उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये एक वही-एक पेन, माणुसकीच्या वह्या, मोफत वहया वाटप आणि यावर्षी ज्ञानाची शिदोरी असा नावीण्यपूर्ण उपक्रम राबवला आहे. यामुळे आतापर्यंत सुमारे 180 गरजू मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य दिले मिळाले आहे.ज्ञानाची शिदोरी या उपक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने संदीप डाकवे, उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे व त्यांची टीम सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. सध्या सोशल मिडीयाचा जमाना आहे. या सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये चांगल्या प्रकारे जागृती करता येते. हे ध्यानात घेवून व्हॉटस्अप, फेसबुक इ.सारख्या माध्यमांवर मदतीसाठी आवाहन केले आहे.याचाच एक भाग म्हणून मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत सेलिब्रिटी स्टार्स कडून ज्ञानाची शिदोरी या उपक्रमास सहकार्य करण्याचे आवाहन करत असलेल्या व्हिडीओ क्लीप तयार करुन त्या सोशल मिडीयावर व्हायरल केल्या जात असून त्याला लोकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे शैक्षणिक साहित्य जमा होण्यास मदत होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटी स्टार्स आणि स्पंदन ट्रस्ट यामध्ये समन्वय साधण्याचे काम एफयु इव्हेन्टस् अ‍ॅन्ड मॅनेजमेंट (श्री.उमेश माने आयडी 509) हे करत आहेत. आतापर्यंत अभिनेत्री जुई गडकरी, अभिनेत्री वृषाली हटाळकर, पार्श्‍वगायिका कविता राम, अभिनेत्री राधिका पाटील, अभिनेत्री सोनल पवार, अभिनेत्री अमृता उत्तमवार, अभिनेत्री सायली काळे, अभिनेते स्वप्नील काळे, अभिनेत्री मुयरी आवड, अभिनेत्री प्रियांका करंदीकर आदी सेलिब्रिटी स्टार्सनी व्हीडीओ क्लीप च्या माध्यमातून आवाहन करत भाग घेतला आहे.ज्ञानाची शिदोरी या उपक्रमास आतापर्यंत रोख रक्कम रु.4,103/-, चित्रकला वही 60,  फुल स्केप वहया 300,  प्लास्टिक कंपास 100, पेन 1100, स्केच पेन पाकेट 200 इ.प्रकारचे शैक्षणिक साहित्य जमा झाले असून ते शाळा सुरु होण्यापूर्वी गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोच करण्यात येणार आहे. सेलिब्रिटी स्टार्स च्या आवाहनामुळे या उपक्रमाला चार चाँद लागले आहेत. याशिवाय अभिनेत्री वर्षा दांदळे, अभिनेते जगन्नाथ निवंगुणे, अभिनेते विजय वीर, अभिनेत्री संध्या वेल्हाळ, अभिनेते सुयश शिर्के,  अभिनेते सचिन पाटील,  पार्श्‍वगायिका कविता राम या सेलिब्रिटी स्टार्सनी ट्रस्टच्या एकूण कार्याला व्हीडीओव्दारे शुभेच्छा दिल्या आहेत. अजूनही ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे त्यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे मो.9764061633 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रसिध्दीपत्रकाव्दारे करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular