Thursday, June 26, 2025
Homeठळक घडामोडीमहाराणा प्रतापजी यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी:आ. पाटील

महाराणा प्रतापजी यांचे कार्य तरुणांसाठी प्रेरणादायी:आ. पाटील

वाई : पंधराव्या शतकात मोघलांशी कडवी झुंज देणारा लढवय्या राजा म्हणून महाराणा प्रतापजी यांचे नाव आदराने घेतले जाते. राजपूत समाज हा लढावू समाज म्हणून त्या काळात ओळखला जात होता. हाताच्या बोटावर मोजण्या इतके राजे पराक्रमी होते त्यामध्ये महाराणा प्रतापजी यांचे नाव सर्वात वरच्या क्रमांकावर होते. महाराणा प्रतापजी यांचे समाज बांधणीचे कार्य खूप मोठे होते, हे आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे, असे उदगार जननायक आ.मकरंद पाटील यांनी वाईच्या सोनगीरवाडीत कै. सागर मालुसरे मित्र समूहाच्या वतीने महाराणा प्रतापजी यांची 479 वी जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी आयोजित कार्यक्रमात बोलताना काढले.
आ.मकरंद पाटील यांच्या हस्ते महाराणा प्रतापजी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचाशुभारंभ आयोजित केला होता. त्यावेळी आमदार पाटील बोलत होते. छ. शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन आणि महाराणा प्रताप जयंती उत्सवाच्या निमित्ताने सोनगीरवाडी, वाई येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आ. मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, भारत खामकर, राजेश गुरव, बाळासाहेब बागुल, महाबळेश्वर नगरसेवक संदीप साळुंखे, दिपक हजारे, बाळासाहेब चिरगुटे, धनंजय हगिर, राजेंद्र तांबेकर, सचिन सावंत, महेश डोंगरे, मावळा प्रतिष्ठानचे गिरीधर मालुसरे, संदीप पवार आदींसह महाराणा प्रताप मंडळ आणि मावळा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आमदार मकरंद पाटील म्हणाले, कै. सागर मालुसरे यांचे ही जयंती साजरी करण्यामागे मोठे योगदान आहे. गेली दहा वर्षे ते सातत्याने हे कार्य पुढे नेण्याचे काम करीत आहेत. सोनगीरवाडीतील तरुणांना एकसंघ ठेवण्याचे समाजाभिमुख कार्य त्यांनी अतिशय जोमाने केले. कै. सागर मालुसरे यांचे कार्य पुढे नेण्यासाठी महाराणा प्रतापजी जयंती निमित्त तरुणांना प्रबोधन करण्याचे कार्य या जयंती निमित्त यापुढे चालू रहावे अशी अपेक्षा आमदार पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी उपनगराध्यक्ष-अनिल सावंत यांनी मनोगत व्यक्त केले. संयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप प्रभाळे यांनी केले. महाराणा प्रतापजी जयंतीच्या कार्यक्रमास सोनगीरवाडीसह परिसरातील ग्रामस्थांची चांगली उपस्थिती होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular