Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीनित्रळ येथील विद्युत डीपी धोकादायक

नित्रळ येथील विद्युत डीपी धोकादायक

परळी : नित्रळ येथील धोकादायक डीपी सोबत पोल वरील वायरिंगचा आलेल्या झोलमुळेही लोकांचे जीवन धोक्यात आले असून या समस्याबाबत आणि पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणा पर्यंत थ्री पेज पोलचे काम त्वरित होणेबाबत गोडोली कार्यालय मुख्य सहाय्यक कार्यकारी अभियंता आणि परळी कार्यालयात शाखा अभियंता यांना नित्रळ ग्रामस्थांनी दिले निवेदन देऊन समस्या लवकरात लवकर सोडवण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले
मौजे नित्रळ येथील केदारेश्वर वॉर्ड क्रमांक 1 मधील आपल्या विभागाच्या विद्युत पुरवठा मंडळाची डीपी दुरावस्थेत आहे. नित्रळ गावातील तिन्ही वॉर्ड मधील पोलवरील वारीचा ताण काढणे आवश्यक आहे. नित्रळ गावच्या तिन्ही वॉर्ड मध्ये पिण्याच्या पाण्यासाठी बोअरवेलची योजनेला अनेक वर्षे झाली आहेत परंतु याठिकाणी थ्री पेज लाईनचे पोल नसल्याने ग्रामस्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. डीपी दुरुस्त न केल्यास व पोल वरील वायरींगचा झोल न काढल्यास कोणत्याही क्षणी मोठी धोकादायक घटना घडू शकते व जीवितहानी होऊ शकते.
सदर डीपी विनाविलंब दुरुस्त करून वीज पोल वरील वायरिंगचा झोल पूर्ववत दुरुस्त करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या बोअरवेल पर्यंत थ्री पेज आणि कातवडी गावाच्या डीपी मधून आलेले सिंगल पेज पोलची लाईन बंद करून नित्रळ मधील वॉर्ड क्रमांक 2 मधील डीपी मधून थ्री पेज पोलची लाईन उपलब्ध करून पूर्ववत करण्यासाठी शाखा अभियंता बिराजदार यांना नित्रळ ग्रामस्थांच्या वतीने निवेदन द्वारे यांना नित्रळ ग्रामस्थांनी सादर केले. शाखा अभियंता बिराजदार यांनी दोन दिवसात वायरिंग मध्ये आलेल्या झोल काढून देण्यासाठी यंत्रणा कामी लावण्याचे व एक महिन्यात नवीन डीपी बॉक्स व धोकादायक स्थिती दूर करण्याचे आश्वासन देन्यात आले.
थ्री पेज बाबत आपण लोकप्रतिनिधी यांची मदत घ्यावी व त्याबाबत त्यांचे पत्र घ्यावे यानंतर याबाबतचा प्रस्ताव बनवून मी आमच्या कार्यालयाला पाठवून सहकार्य करण्याचे ही आश्वासन दिले. वरील विषयांचा प्रशासन किती गांभीर्याने विचार करून त्वरित कार्यवाही करते आहे याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular