महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुका हा पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील तालुका असून या तालुक्यात असणार्या विपुल वनसंपदेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी मधमाशा पालन हि योजना अतिशय उपयुक्त असून स्फूर्ती कार्यक्रमा अंतर्गत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोध्योग मंडळ राबवीत असलेल्या स्फूर्ती क्लस्टर योजनेचा लाभ घेऊन जास्तीजास्त मधापाळांनी मधमाशा पालन व्यवसाय सुरु करावा असे आवाहन महाबळेश्वरच्या तहसीलदार मीनल कळसकर यांनी केले.
मधसंचालनालय महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोध्योग मंडळ व खादी ग्रामोध्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या स्फूर्ती कार्यक्रमा अंतर्गत महाबळेश्वर मधमाशा पालन समूह योजना अंतर्गत समावेश असणार्या महाबळेश्वर तालुक्यातील एकूण 470 मधपाळा पैकी पहिल्या सत्रातील मधपाळाचे प्रशिक्षण सत्र कार्याक्रमाचा सामारोप तहसीलदार मीनल कळसकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. यावेळी मधपाळांना केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात तहसीलदार कळसकर यांनी वरील आवाहन केले. यावेळी डी.आर .पाटील ( संचालक मधसंचालनालय महाबळेश्वर ),लेखापाल अविनाश रांगडे मध पर्यवेक्षक बी.डी. महाडीक आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी संचालक डी.आर .पाटील यांनी प्रमुख पाहुण्याचे स्वागत करून प्रास्ताविक केले. तसेच शासनाच्या स्फूर्ती योजनेची हि सविस्तर माहिती सांगितली .महाबळेश्वर तालुक्यातील शासना मार्फत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोध्योग मंडळ राबवीत असलेली स्फूर्ती समूह योजना हि देशातील पहिली योजना असल्याचे सांगून तालुक्यातील मधपाळांनी याचां मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन केले.या योजने अंतर्गतभाग घेतलेल्या मधपाळानां प्रत्येकी सात सागवानी मधपेट्या ,समुहामध्ये एक स्टेनलेस स्टीलचे मधयंत्र व मध साठविण्यासाठी स्टीलची भांडी 90 टक्के अनुदानावर देण्यात येणार आहेत तसेच मधपाळांनी उत्पादित केलेला मध खादी ग्रामोध्योग मंडळा मार्फत हमी भावाने खरेदी करून त्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे तसेच प्रजनन करून मधमाशा वसाहतींची संख्या वाढविण्यात येणार असल्याची माहिती हि यावेळी संचालक डी.आर.पाटील यांनी दिली.
प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात महाबळेश्वर तालुक्यातील दरे,नावली ,येरणे ,क्षेत्रमहाबळेश्वर ,कारवीचाआळा यासह सभोवतालच्या परिसरातील महिला व पुरुष मधपाळ मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रमुख पाहुण्या मीनल कळसकर यांच्या व अन्य मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण करण्यात आले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक बी.डी. महाडीक यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश रांगडे यांनी केले.
महाबळेश्वर तालुक्यातील पर्यावरण संवर्धनास मधमाशा पालन व्यवसाय अत्यंत उपयुक्त आहे : तहसीलदार मीनल कळसकर
RELATED ARTICLES