ओगलेवाडी : वन विभागाच्या वतीने राबवण्यात येणार्या निसर्ग पर्यटन योजनेसाठी ऐतिहासिक सदाशिवगडाच्या सर्व्हेच्या कामास शुक्रवारपासुन सुरूवात करण्यात आली. परिक्षेस वनअधिकारी डॉ. अजित साजणे, माजी पंचायत समिती सदस्य दीपक लिमकर, सदाशिवगड मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. योगेश कुुंभार, पुजारी आनंदा गुरव आदींची प्रमुख उपस्थिती होती. सर्व्हेचे काम झाल्यानंतर कोल्हापुरचे वास्तुविशारद इंद्रजीत नागेश्वर यांनी सदाशिवगडाची पाहणी करून सर्व्हे करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार शुक्रवारपासुन संपुर्ण गडाच्या सर्व्हेचे काम सुरू करण्यात आले आहे. यासाठी गडाच्या संरक्षक मेट म्हणुन ओळखल्या जाणार्या हजारमाची, राजमाची, वनवासमाची व बाबरमाची या चारही ग्रामपंचायती, ग्रामस्थ व गड प्रेमींची मदत लाभत आहे.
गडाच्या पायथ्यापासुन पठारापर्यंत व गडाच्या चारही बाजु तसेच चार माच्यांचा या सर्व्हेत समावेश करण्यात आला आहे. मुख्य गड, गडाच्या चार बाजुला असलेल्या चार माच्यांतुन गडावर येणार्या पायवाटा, विसाव्याची ठिकाणे संपुर्ण गडावर असलेली झाडे, विहिरी, तळे,सदाशिवाचे व मारूतीचे मंदिर, गार्डन, टाके आदी गडावर अस्तित्वात असणार्या सर्व खाणाखुणांचा समावेश या सर्व्हेत करण्यात येणार आहे. साधारणत: सात ते आठ दिवस गडाच्या सर्व्हेचे काम चालणार आहे.
सर्व्हे पुर्ण झाल्यानंतर वास्तविशारद इंद्रजीत नागेशकर गडाच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार करणार आहेत. विकास करताना गडाचे ऐतिहासिक महत्व कायम रहावे, यासाठी इतिहास अभ्यासकांची मदत घेण्यात येणार आहे. त्या दृष्टीने इतिहास अभ्यासक के. ए. देसाई व इंद्रजीत नागेशकर यांची भेट घडवुन आणण्यात आली होती. यावेळी गडाच्या विकास आराखडयाबाबत दोघांत चर्चाही झाला. नागेशकर यंानी दिलेल्या सुचनांनुसार सर्व्हेचे काम करण्यात येत असल्याची माहिती डॉ. साजणे यांनी दिली.
सदाशिवगडावर सर्व्हेच्या कामास प्रारंभ
RELATED ARTICLES