सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे सातार्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदनयराजे भोसले यांनी लोकसभा निवडणुकीत हॅट्रिक साधली आहे. त्यामुळे दुष्काळ निवारण, मराठा-धनगर-मुस्लिम आरक्षण, त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे सचित्र चरित्र व इतर विकास कामांबाबत खा. श्री. छ. उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. व त्यांना निवेदन दिले.
यावेळी पवार साहेब अध्यक्ष असलेल्या मराठा मंदिरने प्रकाशित केलेले शेजवलकर लिखित शिवचरित्राचे पुनर्मुद्रण करावे या मागणीचे निवेदन पवार साहेबानां दिले. तसेच दुष्काळ, मराठा-मुस्लिम-धनगर आरक्षणाबाबत पवार साहेबांशी सविस्तर चर्चा केली. शरद पवार यांनी शिवचरित्राचे पुनर्मुद्रण करून देण्याचे आश्वासन दिले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून सातारचे खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश मिळू शकते.त्यामुळे सध्या उदयनराजेंनी आपली स्टाईल बदलली आहे. सर्वांच्या गाठीभेटी घेऊन सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आजची भेट ही नेहमी प्रमाणे झाली नसून भविष्यात सातारा जिल्हा पुन्हा राज्यात ठसा उमटविल्या शिवाय राहणार नाही असे सध्या तरी दिसत आहे. या भेटीच्या वेळी संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे,प्रसार माध्यम प्रमुख चंद्रकांत पाटील आणि रवी शिंदे आदी उपस्थित होते.
दुष्काळासह आरक्षणावर खा. उदयनराजेंची शरद पवारांशी चर्चा
RELATED ARTICLES