म्हसवड : माण तालुक्यात भालवडी व परिसरात वादळी वार्यासह पाऊसाने हजेरी लावली असून वार्यामुळे अंगणवाडी वरील पत्रा उडाला तर छावणीतील जनावरांसाठी केलेला निवारा उडून नुकसान झाले आहे.
माण तालुक्यातील भालवडी, खुटबाव, मार्डी परिसरात वादळी वार्यासह पाऊसाने हजेरी लावली असून वार्यामुळे भालवडी येथील अंगणवाडी शाळेचा पत्रा उडला असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.
तसेच येथील जनावरांच्या चारा छावणी मध्ये शेतकर्यांनी जनावरांसाठी निवारा केला होता तो कोलमडून पडल्याने उघड्या माळरानावर पशुधन वाचवण्यासाठी धडपडत असलेल्या बळीराजाची किरकोळ पाऊसाने चांगलीच धांदल उडाली होती.
माण तालुक्यात वादळी वार्यासह पाऊसाने हजेरी
RELATED ARTICLES