Friday, June 20, 2025
Homeताज्या घडामोडीजंगलहुड डायनासोर थीम पार्क सर्वच पर्यटकांचे लाडके स्थळ बनेलः श्री. छ.उदयनराजे भोसले

जंगलहुड डायनासोर थीम पार्क सर्वच पर्यटकांचे लाडके स्थळ बनेलः श्री. छ.उदयनराजे भोसले

साताराः आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनाच विरंगुळा हवासा वाटतो. पाचगणी, महाबळेश्‍वर येथील पर्यंटनाचा आनंद लुटताना आता पर्यटकांना नवीन ठिकाणे पहावीशी वाटतात, जंगलहुड डायनासोर थीम पार्कमधील हे साहसी खेळ,नवनवीन खेळही केवळ लहानांनाच नव्हे तर आबाल वृध्दांना आवडतील असेच आहेत.हे ठिकाण अल्पावधीतच सर्वच पर्यटकांचे लाडके स्थळ बनेल असे उदगार सातारचे लाडके खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांनी काढले.
पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या नसरापूर येथील जंगलहुड डायनासोर थीम पार्कच्या अ‍ॅडव्हेंचर झोनचे उदघाटन खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांचे हस्ते नुकतेच संपन्न झाले त्यावेळी त्यांनी वरील उद्गार काढले. यावेळी या थीम पाकर्ं चे संचालक वैद्य सुयोग दांडेकर, केदार भट,सातारच्या माजी नगराध्यक्षा सौ.रंजना रावत,अथर्व दांडेकर,सौ.नेहा दांडेकर,शर्वरी दांडेकर, बोरगे पाटील,गणेश कोंडे, निशीकांत लोखंडे, जयकुमार बेंद्रे ,करंडी व नसरापुरचे सरपंच आणि ग्रामस्थ तसेच पर्यंटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उदघाटन प्रसंगी खा. उदयनराजे भोसले यांचे स्वागत सुयोग दांडेकर व केदार भट यांनी केले. या थीम पार्क विषयी माहिती देताना वैद्य सुयोग दांडेकर म्हणाले की,मागील आठ वर्षे या थीम पाक र्ची उभारणी चे काम सहा एकर परिसरात सुरु आहे. आज या पार्कच्या अ‍ॅडव्हेंचर झोनचे उदघाटन लाडके खासदार श्री. छ.उदयनराजे यांचे होत आहे याचा विशेष आनंद वाटतो.या पार्क ला अल्पावधीतच लोकप्रियता लाभेल आणि हे पार्क सर्वांचे लाडके पयर्ंटन स्थळ बनेल असा विश्‍वास वाटतो.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शंन करताना खासदार उदयनराजे म्हणाले की, आज तरुण पिढी संगणकावर आणि मोबाईलवर गेम खेळण्यात गकर्ं आहे. यामुळे त्यांना मानेचे आजार जडत आहेत. या थीम पार्क मुळे तरुणांना आकर्षिैंत करणारे असे हे खेळ त्यंाना येथे येण्यास भाग पाडतील, मलाही या खेळांचा आनंद घ्यावा वाटतो असेच हे पार्क आहे .
या पार्कमध्ये सध्या पयर्ंटकांना महाकाय झुला,नेमबाजी, डायनासोर ची दुनिया, डायनेा राईड, रअधांतरी रोप सायकलिंग, महाकाय फिरते पाळणे, कृत्रिम भिंतीवरील चढाई, डायानासेारचे सांगाडे, डोक्या एवढ्या वाढलेल्या गवतातुन अचानक डोकावणारे डायनासोर, आगळी वेगळी झाडे, रॉक ए सॉरस, फन इन सन, टोरनॅडो, महाकाय सी सॉ. अंड्यातुन बाहेर पडणारे डायानासोरचे पिल्लू, गोरीला माकड, विविध प्रजातीचे माहीते देणारे डायनासोरचे जग, कृत्रिम धबधबेअसणारे हिरव्यागार निसर्गातील हे पार्कं खरोखर आगळी वेगळी दुनिया असून याला सर्वांनी भेट द्यावी असे आवाहन यावेळी संचालक केदार भट यांनी केले. याप्रसंगी नसरापुर, करंडी गावचे सरपंच, ग्रामस्थ,सातारचे अनेक क्षेत्रातील मान्यवर, विकास धुळेकर, राज्यातुन तसेच राज्याबाहेरुन आलेले पयर्ंटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular