साताराः येथील डेक्कन एज्युकेशन सेासायटी पुणेच्या न्यू इंग्लिश स्कूलचा यावर्षीचा माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल 92.16 टक्के लागला आहे. मार्च 2019 मध्ये संपन्न झालेल्या इ.10 वीच्या परिक्षेत शाळेतील 54 विद्यार्थी 90 टक्क्याहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
या शालांत परिक्षेसाठी शाळातून 383 विद्यार्थी बसले होते त्यातील 353 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 158 विद्यार्थी प्रथम विशेष प्राविण्य मिळवलेले आहेत तर प्रथम श्रेणीत 92, द्वितीय श्रेणीत 81 व तृतीय श्रेणीत 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या परिक्षेत शाळेतील इ.10 ब ची विद्यार्थीनी संस्कृती संजय तावरे ही 98.20 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली आहे तर आदित्य संजय भोसले हा 97.80 टक्के गुण मिळवून शाळेत दुसरा आला आहे. कु. गायत्री हनमंत सोनटक्के ही 97.60 टक्के गुण मिळवून तिसरी आली आहे. तर आर्या सुहास कढणे व प्रियांका शशिकांत यादव या दोघंीनी 97.20 टक्के गुण मिळवून 4 था क्रमांक मिळवला आहे. महमंद जैद, शाहिद बागवान याने 97.10 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळवला आहे तर मानसी संजय कोरडे व विवेक विभास नाईक यांनी 96.60 टक्के गुण मिळवून सहावा क्रमांक मिळवला आहे.
या यशाबद्दल शाळेच्या शालेय समितीचे अध्यक्ष अमित कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त अनंत जोशी, डॉ.संजीव गोखले, डॉ.मधुसूदर मुजूमदार शाळेचे नुतन मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापक डी.एस.कांबळे, पर्यवेक्षक दिलीप रावडे, सौ. भारती दळवी, सौ.निलम तीरमारे, सौ.सुजाता पाटील, सर्व शालेय शिक्षक, शिक्षिका, पालक प्रतिनिधी यांनी या सर्व विदयार्थी विद्यार्थीनीचे विशेष अभिनंदन केले आहे.
न्यू इंग्लिश स्कूलचा 10 वी चा निकाल 92.16 टक्के
RELATED ARTICLES