Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीएमआयडीसी विकासाबाबत अधिकार्‍यांशी खा.श्री.छ.उदयनराजे यांची विस्तृत चर्चा

एमआयडीसी विकासाबाबत अधिकार्‍यांशी खा.श्री.छ.उदयनराजे यांची विस्तृत चर्चा

सातारा : सातारा आणि नगर जिल्हयातील औद्योगिक वसाहती सुमारे 1974 च्या सुमारास सुरु झाल्या. नगर जिल्हयातील तत्कालीन लोकप्रतिनिधींनी उद्योजकांना संरक्षण देण्याची हमी दिल्याने नगरच्या एमआयडीसीचा विकास झाला, परंतु तत्कालिन सातारच्या लोकप्रतिनिधींची अनास्था आणि नरो व कुंजरोवा अशी भुमिका यामुळे सातारच्या एमआयडीसीचा म्हणावा तसा विकास झाला नाही ही वस्तुस्थिती आहे. खापर मात्र तिसर्‍यावरच फोडले जाते. ज्या लोकांना इंन्डस्ट्रयल प्लॉट दिले आहेत व जे प्लॉट पडुन आहेत त्या जागा तातडीने ताब्यात घेण्याची कार्यवाही करा. इंडस्ट्री सुरु करण्यास इच्छुक असलेल्यांना सदरच्या जागा द्या. आम्हाला रिझल्ट ओरिएन्टेड काम पाहीजे, अश्या प्रकारच्या सूचना सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सातारा एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना दिल्या.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज सातारच्या एमआयडीसी कार्यालयास भेट देवून तेथील अधिकार्‍यांशी एमआयडीसीच्या विकासाबाबत विस्तृत चर्चा केली. यावेळी विका्रंत चव्हाण, प्रादेशिक अधिकारी,कोल्हापूर, उपअभियंता सुकुमार पोवार,क्षेत्र व्यवस्थापक सागर पवार,सहा.अभियंता विकास गायकवाड, प्रमुख उपस्थित होते.
वेल स्टार्ट इज हाफ डन म्हणतात त्याप्रमाणे येथील एमआयडीसीची सुरुवातच निरुत्साही लोकप्रतिनिधींमुळे चांगली झाली नाही. त्यामुळेच आजची विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीपासून सातारच्या जुनी आणि नवी एमआयडीसी करीता जागा किती घेतली गेली. ज्या जागा घेतल्या त्या मुळ मालकांना मोबदला मिळाला का, सदरची जागा किती व्यक्तींना रितसर प्रदान केली, कोणत्या कारणाकरीता दिली, आज त्या प्लॉटवर नेमका कोणता उद्योग सुरु आहे, त्यावेळच्या व नंतर सुधारित केलेल्या ले-आउट प्रमाणे रेसिडेन्सियल झोन, इंन्डस्ट्रीयल झोन, रिफ्रेशमेंट झोन किती व कोणकोणते होते याबाबतची माहीती तसेच इंन्डस्ट्रीय झोन करीता सातारा जिल्हयात किती जागा आरक्षित करण्यात आली आहे याबाबतची माहिती दोन-तीन दिवसांत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केल्या. तसेच ज्यांनी इंडस्ट्रीयल प्लॉट घेवून हौसिंग स्कीमस् राबवल्या जात असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी. महाराष्ट्र स्कूटरची 60 एकर आणि शासकीय दूध डेअरीची सुमारे 40 एकर अशी मिळून 100 एकर जागा बिनवापराची आहे. त्याबाबत एमआयडीसी कार्यालयाने योग्य ती माहीती द्यावी. रिजनल ऑफिसर कोल्हापूरसह संबंधीत प्लॉटधारक यांची दिनांक 22 जुन 19 रोजी बैठक बोलावण्यात यावी असे सूचित केले.
यावेळी उपस्थित टपरीचालक महिलांनी आमच्या टपर्‍या हलवल्या तर आम्ही जगायचं कसं, गेल्या आठ दिवसापासून आमची मुलं-बाळं उपाशी आहेत, आमच्यावर अन्याय करु नका अशी विनंती केली, त्याचवेळी आम्ही कमर्शियल प्लॉट घेवून व्यवसाय करतो. आमच्या हॉटेल शेजारी दोन- दोन टपर्‍या टाकल्या आहेत, त्यामुळे सामान्य व्यक्ती हॉटेल ऐवजी टपरीकडे जातात, आमच्या नोकरांचे पगार सुध्दा देता येत नाही, आम्ही जगायचं कसं, अशी विचारणा करुन, टपर्‍या काढणेत याव्यात अशी मागणी केली
एमआयडीसी मधील प्लॉट वितरीत केले आहेत तथापि ते प्लॉट बिनवापरात आहेत अश्याची यादी करुन, जे प्लॉट पडून आहेत त्या जागा एमआयडीसीने ताब्यात घेणेबाबत कार्यवाही करावी, एमआयडीसी एरियात छोटया टपर्‍या टाकून काही व्यक्ती आपला चरितार्थ चालवित आहेत, त्यांच्यावर तुर्त कारवाई करु नये, दि. 22 जुन 19 च्या बैठकीनंतर याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असेही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी सुचित केले.प्रारंभी विका्रंत चव्हाण, प्रादेशिक अधिकारी, कोल्हापूर यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. या भेटीच्या वेळी माजी सभापती सुनील काटकर, युवा नेते संग्राम बर्गे,बाळासाहेब खरात, रॉबर्ट, शफी इनामदार, धनगरवाडीचे सरपंच तानाजी खरात, तसेच एमआयडीसी मधील टपरी धारक, हॉटेल संघटनांचे पदाधिकारी, मोठया संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular