फलटण: निंभोरे (ता.फलटण) येथे तिरंगा मंगल कार्यालयामध्ये पाण्याच्या टाकीत पडून तिन वर्षीय मुलगा मृत्युमुखी पडला असल्याने मंगल कार्यालय व्यवस्थापणाच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र भावना भडकल्या असून संबंधित मालक/चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरा फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात सुरू होते.
याबाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार कार्यालयाच्या व्यवस्थापणा कडून ही अंडरग्राउंड टाकी उघडी राहिल्याने त्याचा बळी गेल्याचे नातेवाईकांचे
म्हणणे असून लग्न सोहळ्यात आलेल्या या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे पाहून नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता,
आज बुधवार दि.12 रोजी दुपारी दोन वाजता भोसले-सूर्यवंशी विवाह सोहळा होता यामध्ये वरपक्षांकडील प्रज्ञेश प्रमोद पवार रा.भादवडे ता.खंडाळा वय तीन वर्षे हा मुलगा खेळत असताना अंडरग्राउंड पाण्याच्या टाकीत पडून मृत्युमुखी पडला. पाण्याची टाकी मोठी होती आणि ती झाकलेली नव्हती ती झाडांमध्ये असल्याकारणाने न दिसल्यामुळे प्रज्ञेश त्यामध्ये पडला असावा असा अंदाज असून हा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे पोलीस तपासणी झाल्यावरच समजेल असे सांगितले जात आहे.
दीड तास शोध घेतल्यानंतर तो टाकीत पडल्याचे आढळून आले व त्यामध्ये तो जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले.कार्यालयाच्या मालकाचा व व्यवस्थापनाचा यामध्ये दोष असून पाण्याची टाकी उघडी ठेवल्याने हा धोका झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. फलटण पोलीस ठाण्यामध्ये नुकतीच तक्रार देण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते.
पाण्याच्या टाकीत पडून तीनवर्षीय मुलगा मृत्युमुखी
RELATED ARTICLES