सातारा : सामाजिक न्याय विभागाद्वारे चालविण्यात येणा-या सातारा येथील 125 जयंती, नवीन मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह व सदर बझार येथील शासकीय वसतिगृहात सन 2019-2020 या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यालयीन विभागातील इयत्ता 8 वी ते 10, 11 वी, तसेच प्रथम आणि पदवीत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यालय व महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पध्दतीने सुरु असून विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज भरुन घेण्यात येणार आहेत. प्रवेश अर्जाचे दोन्ही वसतीगृहामध्ये विनामूल्य वाटप सुरु आहे. वसतीगृहात प्रवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना निवास व्यवस्था, भोजन, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, खेळाचे साहित्य् इ सोयी सुविधा मोफत पुरवल्या जातात. सदर वसतिगृहामध्ये अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास वर्ग, इतर मागासवर्ग, खुला, अपंग, अनाथ (तसेच वसतीगृहातील एकूण प्रवेशापैकी 15 टक्के खासबाब म्हणून) प्रवर्गनिहाय प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. अधिक माहितीसाठी संबंधित वसतिगृहात संपर्क साधावा असे आवाहन गृहपाल यांनी केले आहे.
सदरबझार व गोडोली येथील मुलींचे शासकीय वसतीगृहात प्रवेश सुरु
RELATED ARTICLES