सातारा (एकनाथ थोरात) : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जीकांवा म्हणून सातार्यातील सदरबझार मधील न्यू म्हाडा कॉलनी मधील सार्थक जेन्टस पार्लसचे कालाकार, मालक महेश पवार यांनी आपल्या केस कर्तनच्या कलेवर एका युवकाच्या डोक्यावर इंग्रजीमध्ये इंडीया अक्षर कोरुण विश्वचषकचा लोगो काढून क्रिकेट प्रेमींचे आकर्षन ठरु लागला आहे.
भारताने विश्वचषकाच्या पहिल्या सामान्यात 6 गडी राखून दक्षिण अफ्रिकेवर दणदणीत विजय मिळविला. या नंतर भारतानील क्रिकेट शौकिनांना भारतीय संघाबाबतचा अभिमान वाढू लागला आहे. त्याचा प्रत्यय सातारा शहरातील सदरबझार मधील न्यू म्हाडा कॉलणी मधील सार्थक जेन्टस पार्लरचे कलाकार महेश पवार यांनी एका युवकाच्या डोक्याच्या केसावरती आपल्या कलाकृतीने चक्क वर्ल्डकपचे चित्र साकारले आहे. पवार यांना विश्वचषकाचे केसावरील चित्र बनविण्यास एक तास वेळ लागला आहे. यापूर्वी त्यांनी डोक्यावरील केसावर समस्त हिंदूचे आराध्य दैवत गणेशाचे चित्र रेखाटले होते. त्याच्या या कलेला युवक वर्गातून उस्फुर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. सातारा जिल्हा नाभिक संघटनेने महेश पवार यांच्या कलेची दाद घेवून गौरव होणे गरजेचे आहे. सातारा शहरात सध्या वर्ल्डकपच्या चित्राचे कौतक होताना दिसत आहे.
नाभिक कलाकार महेश पवार यांनी युवकाच्या डोक्यावर साकारला विश्वचषकचा लोगो
RELATED ARTICLES