Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकिल्ले अजिंक्यतार्‍यामुळे सातार्‍याचे नाव देशभरात पोहचेल :आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ; शिवसृष्टीसाठी अजिंक्यतार्‍यावर...

किल्ले अजिंक्यतार्‍यामुळे सातार्‍याचे नाव देशभरात पोहचेल :आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले ; शिवसृष्टीसाठी अजिंक्यतार्‍यावर केली पाहणी

सातारा: किल्ले अजिंक्यतार्‍यावर शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणारी भव्य शिवसृष्टी आणि छ. शाहू महाराजांचा पुतळा उभारणार असल्याचा संकल्प छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवराज्याभिषेक दिनी सोडला होता. त्याच अनुशंगाने आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आज किल्ले अजिंक्यतार्‍यावर जावून पाहणी केली.
दरम्यान, जुने जाणते इतिहासकार यांच्यासह ऐतिहासिक वास्तुविशारद यांच्या सहकार्याने किल्ले अजिंक्यतार्‍यावर शिवसृष्टी आणि छ. शाहू स्मारकाची उभारणी केली जाईल, ज्याने सातार्‍याचे नाव देशभरात ओळखले जाईल, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी माध्यमांशी बोलताना केले.
दुपारी एकच्या सुमारास भर पावसात आ. शिवेंद्रसिंहराजे अजिंक्यतार्‍यावर पोहचले. राजसदर, गडाची तटबंदी यासहस ढासळलेले बुरुज व अखेरच्या घटका मोजत असलेल्या किल्ल्यावरील वास्तूुंची आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, सातार्‍याचा अभिमान आणि स्वाभिमान म्हणजेच अजिंक्यतारा किल्ला होय. याच अजिंक्यतार्‍यावर छ. शाहू महाराजांनी मराठ्यांची तीसरी राजधानी स्थापन केली. त्यांनतर त्यांनी शाहूनगरी अर्थात आजची सातारा नगरी वसवली. त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा किल्ले अजिंक्यतार्‍यावर नाही, हे मनाला न पटणारे आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने अजिंक्यतारा किल्ला आणि ही भुमी पावन झालेली आहे. शिवरायांनी अजिंक्यतारा किल्ल्यावर वास्तव्यही केले आहे. त्यामुळे अजिंक्यतार्‍यावर शिवसृष्टी उभारणे आवश्यक आहे. अजिंक्यतारा म्हणजेच सातार्‍याचा इतिहास आहे. त्यामुळे हा इतिहास पुढच्या पिढीसमोर चांगल्या अवस्थेत गेला पाहिजे. याठिकाणी पर्यटन वाढले पाहिजे तसेच पर्यटकांसाठी सुविधाही उपलब्ध झाल्या पाहिजेत.
आवश्यक त्या वास्तूंची डागणुजी केली जाईल. पुर्वी होते तसे होणार नाही पण, किमान त्यासारखे झाले पाहिजे, या उद्देशाने जुन्या जाणत्या इतिहासकारांची मदत घेवून कशापध्दतीने शिवसृष्टी साकारता येईल, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. पर्यटनमंत्री यांच्याकडे निधीची मागणी करणार असून अधिवेशनातही हा प्रश्‍न घेणार आहे. तसेच जिल्हा नियोजन समितीकडेही याबाबत पाठपुरावा करणार आहे. शासनाकडून जास्त निधी मिळणार नाही पण, सातार्‍यात अनेक दानशूर लोक आहेत, त्यांच्या सहकार्याने शिवसृष्टी आणि छ. शाहू महाराज यांचे स्मारक उभारले जाईल. अजिंक्यतारा ही आपली, सातारकरांची ओळख आहे. त्यामुळे या चांगल्या कामासाठी सातारकर निश्‍चित मदत करतील. लवकरच बांधकाम विभागातील सर्व अधिकार्‍यांसमवेत याबाबत बैठक घेतली जाणार असून त्यानंतर सर्वेक्षण आणि इस्टीमेट केले जाईल, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. दरम्यान, पडलेली विद्युत खांब त्वरीत उभे करुन दिवे सुरु करण्याची सुचनाही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांना यावेळी केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular