परळी : सोनवडी ते कारी-रायघर या मार्गाचे रुंदीकरणाचे काम हाती घेतल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पर्यायी रस्ता ओढया नाल्यातून काढल्याने या मार्गावरच गुरुवारी सकाळु ट्रक रुतला त्यामुळे या मार्गावरची वाहतूक व्यवस्था कोलमडली.
रायघर – आंबळे तसेच कारी गावांमध्ये असणाऱया सात वाडयांना सोनवडी मार्गे सातारला जावे लागते. हा रस्ता कित्तेक वर्षांपासून ना दुरुस्त होता. या मार्गाचे रुंदीकरणाचे काम नुकतेच हाती घेण्यात आले आहे. मात्र हे काम सुरु असताना पर्यायी रस्ता ठेकेदाऱयांनी व्यवस्थीत न काढल्याने वाहनधारकांची मोठी गैर सोय होत आहे. वाहन धारकांसाठी पर्यायी रस्ता सुस्थित करावा अशी मागणी वाहनधारक करत आहेत.
पावसाळ्याच्या दिवसात वाहनधारकांची कसरत
आंबळे- रायघर- कारी येथील सात वाडयांना सोनवडी मार्गाने सातारला येण्याचा एकच मार्ग असल्याने पावसाळयाच्या दिवसात रस्त्याचे रुंदीकरण काम सुरु झाले असल्याने पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे चिखलातून गाडी बाहेर काढताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सोनवडी येथे पर्यायी रस्त्यात ट्रक रुतला
RELATED ARTICLES