Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीजळकेवाडी येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक जखमी; परिसरात भितीचे वातावरण

जळकेवाडी येथे अस्वलाच्या हल्ल्यात एक जखमी; परिसरात भितीचे वातावरण

परळी : जळकेवाडी (ता. सातारा) येथे बुधवारी सायंकाळी नागरिवस्तीत येवून सखाराम शिंदे यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्नालयात उपचार सुरु आहे.
सविस्तर वृत्त असे की, बुधवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या दरम्यान सखाराम शिंदे हे आपली पाळीव जनावरे घेवून घरी येत होते. गावच्या पाणवठयावर आले असता अचानक अस्वलाने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यातुनही त्यांनी मोठया धाडसाने बचाव करत आरडा ओरडा करीत त्यांची सुटका करुन घेतली यावेळी परिसरातील ग्रामस्थ ही आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यांना तत्काळ रुग्नवाहीकेतून जिल्हा रुग्नालयात दाखल करण्यात आले.
जळकेवाडी, भांबवली, आंधारी, कासपठारावरील गावांमधील वरचे वर वन्य प्राण्यांचे हल्ले होत आहेत. यावर वनखात्याने कायमस्वरुपी उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular