वडूज : कोरेगांव तालुक्यातील गुरु हैबतीबाबा भजनी मंडळ दिंडीचे रविवार दि. 23 जून रोजी कुमठे फाटा येथून प्रस्थान होणार असल्याची माहिती दिंडीचालक ज्ञानेश्वर उर्फ निलेश सुतार यांनी दिली.
या दिवशी चिंतामणी बंगला येथून मान्यवरांच्या उपस्थितीत विना व वाहन पूजन करुन दिंडी मार्गस्थ होणार आहे. तेथून कोरेगांव शहरात दिंडी प्रदक्षणा व रात्री माहेश्वरी मंगल कार्यालयात कोरेगांव येथील भोसले ब्रदर्स च्या वतीने वारकर्यांना अन्नदान केले जाणार आहे. त्यानंतर रात्री वारकरी वाहनातून आळंदीकडे रवाना होणार आहेत. दि. 24 पासून माऊलींच्या वारीत दिंडी सोहळा सहभागी होणार आहे.
आळंदी, कळस, पुणे, हडपसर, सासवड, यमाई शिवरी, जेजूरी, वाल्हे, निरा, लोणंद, तरडगांव, निंभोरे ओढा, फलटण, पिंपरद, बरड, धर्मपूरी कॅनॉल, नातेपुते, सदाशिव नगर, माळशिरस, विंझोरी खडूस फाटा, वेळापूर, तोंडले-बोंडले, भंडीशेगांव, वाखरी, पंंढरपूर असा पालखीमार्ग राहणार आहे. या ठिकाणच्या मुक्कामामध्ये उदार अन्नदात्यांच्या माध्यमातून वारकर्यांना भोजन देण्यात येणार आहे. चालू वर्षीच्या अन्नदात्यांमध्ये शांताराम शिंदे (वेळे), सागर सदिष्टे (मुंबई), तुळशिदास सुडे (उदगिर), नारायणराव फाळके (शिंदेवाडी), बोधे बंधू, गोपाळ स्वामी, बाबुराव मोरे, गोरख सुतार, प्रभाकर बोराटे, प्रभाकर घार्गे, विलासशेठ कामठे, संदिप गोडसे, बळवंत उद्योग समूह दहिवडी, रमेश वारंग, जयसिंगराव जाधव, जनार्धन शिंदे, तुकाराम ढमाळ, सतिश निकम, शशिकांत जगदाळे, बोथे ग्रामस्थ, तानाजी फडतरे, दिलीप कुंभार, महेश शिंदे (वडूज), हणमंतराव देशमुख कुरोली, कृष्णराव बनसोडे डांभेवाडी, शेखरभाऊ प्रतिष्ठान माण-खटाव, नारायण गायकवाड गिरझनी, जालिंदर फुले माळवाडी, ज्ञानेश्वर फडतरे व नंदन उद्योग समुह पुणे, दिपक जगदाळे कुमठे, विक्रम शिंदे, श्रीनिवास शेणवलीकर, भास्कर पंडित साप, कृष्णाजी शिंदे बिदर (कर्नाटक) यांचा समावेश आहे.
दिंडी सोहळ्यात जास्तीत जास्त वारकर्यांनी सहभागी होण्याचे आवाहन अतुल सुतार, गोरख सुतार व सहकार्यांनी केले आहे.
हैबतबाबा भजनी मंडळ दिंडीचे दि. 23 रोजी प्रस्थान
RELATED ARTICLES

